सीआरपी, बीआरपी कौन्सिलिंगवेळी मराठी शिक्षकांवर अन्याय

शिक्षण खात्याकडून पुन्हा एकदा मराठी माध्यमाच्या शिक्षकांवर अन्याय
Department of Education Injustice on Marathi teachers during CRP BRP counseling belgaum
Department of Education Injustice on Marathi teachers during CRP BRP counseling belgaum sakal

बेळगाव : शिक्षण खात्याकडून पुन्हा एकदा मराठी माध्यमाच्या शिक्षकांवर अन्याय करण्यात आला असून शुक्रवारी झालेल्या सीआरपी व बीआरपी कौन्सिलिंगवेळी जाणीवपूर्वक मराठी शिक्षकांना दूर ठेवण्यात आले. त्यामुळे यावेळी एकाही मराठी शिक्षकाची सीआरपी व बीआरपी म्हणून एकाही शिक्षकांची निवड झालेली नाही. काही दिवसांपूर्वी सीआरपी व बीआरपी पदासाठी परीक्षा घेण्यात आली होती. यावेळी मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनीही परीक्षा दिली होती.

मात्र त्यानंतर जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयात झालेल्या नवीन सीआरपी बीआरपी कौन्सिलिंगच्यावेळी मराठी माध्यमाच्या शिक्षकांना वगळून बेळगांव शहर आणि ग्रामीण भागातील मराठी सीआरसी केंद्रामध्ये कन्नड शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे शहर आणि ग्रामीण भागातील अनेक मराठी उमेदवारांवर अन्याय करण्यात आला आहे. मात्र उर्दू भाषिकांच्या जागा आरक्षित ठेवण्यात आल्या होत्या व त्या ठिकाणी उर्दू शिक्षकांची सीआरपी व बीआरपी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. परंतु मराठी जागा आरक्षित न करता तिथे कन्नड भाषिक उमेदवारांना नियुक्ती करण्यात आल्यामुळे शिक्षण खात्याचा दुटप्पीपणा स्पष्टपणे दिसून येत आहे.

मराठी शिक्षकांना डावलण्यात आल्याने शहर व ग्रामीण भागातील शिक्षक आणि विद्यार्थ्यांना मराठी संपन्मूल व्यक्ती मिळणार नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात मराठी शिक्षक व विद्यार्थ्यांना आवश्यक ती माहिती देताना अडचण निर्माण होणार आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी व शिक्षण खात्याने याकडे लक्ष देऊन अन्यायकारकपणे झालेली कौन्सिलिंग प्रक्रिया रद्द करून पुन्हा नव्याने कौन्सिलिंग घ्यावे आणि मराठी उमेदवारांच्यावर झालेला अन्याय दूर करावा अशी शिक्षकांमधून होऊ लागली आहे.

मराठी शिक्षकांच्या जागी कन्नड शिक्षकांची सीआरपी व बिआरपी म्हणून निवड करण्यात आल्याने मराठी शाळांना त्रास होऊ शकतो तसेच त्यांच्याकडून चुकीच्या पद्धतीने शिक्षण खात्यापर्यंत माहिती पुरविली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे याबाबत मराठी संघटनांनी आवाज उठवण्याची गरज निर्माण झाली असून लोकप्रतिनिधींनीही याकडे लक्ष द्यावे असे मत व्यक्त होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com