संगोल्यात गणपतराव देशमुखांच्या उमेदवारीवरच राजकीय समीकरणे अवलंबुन

ganpatrao
ganpatrao

संगेवाडी (सोलापुर) - आगामी विधानसभेसाठी आमदार गणपतराव देशमुख यांच्या उमेदवारीवरच सांगोल्यातील राजकीय समीकरणे अवलंबुन असणार आहेत. आमदार देशमुखांनी यावेळीची विधानसभा निवडणुक लढवली तर पारंपारीक तेच प्रतिस्पर्धी असतील, परंतु प्रकृती कारणाने त्यांनी माघार घेतली तर येथील राजकारणात मोठी उलथापालथ पाहवयास मिळणार आहे.

सांगोला हा पारंपारिक शेकाप पक्षाचा बाल्लेकिल्ला म्हणुनच ओळखला जातो. आमदार गणपतराव देशमुखांनी येथे ११ वेळा आमदार होवून वेगळा विक्रम केला आहे. पक्षीय राजकारणापेक्षा येथे आमदार देशमुखांना मानणारा मोठा वर्ग आहे. आमदार देशमुखांनी वयाची नवद्दी ओलांडल्याने जनतेची कामे करताना काही मर्यादा येत असल्याने यावेळची विधानसभा निवडणुक लढविणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह आहे. गेली विधानसभेचीच निवडणुक ते लढविणार नव्हते. परंतु कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर ती निवडणुक लढविली आणि जिंकलीही. यावेळी विधानसभा लढविलीच तर प्रतिस्पर्धी उमेदवारांमध्ये फारसा फरक पडणार नाही. तालुक्यातील आजपर्यंतच्या पारंपारिकच लढती होतील असे मानले जाते. प्रतिस्पर्धी तेच असले तरी काहीवेळेस त्यांचे पक्षीय झेंडे मात्र बदलले जावु शकतात.

निवडणुकीतुन आमदार देशमुखांनी माघार घेतली तर राजकीय चित्र पालटणार - आगामी विधानसभा निवडणुकीतुन प्रक्रुतीच्या कारणामुळे आमदार देशमुखांनी माघारी घेतली तर शेकापचा उमेदवार कोण असेल याबाबत ठोस असे कोणाचेही नाव घेतले जात नाही. पक्षाच्या प्रत्येक कार्यक्रमात त्यांचे पुत्र चंद्रकांत देशमुख आमदार देशमुखांसोबत असतात. पक्षामध्ये आमदार देशमुखांचा शब्दच प्रमाणीत मानला जातो. ते स्वतः निवडणुक लढविणार नसतील तर कोणाचे नाव घेतील तोच शेकाप पक्षाचा उमेदवार असेल. पक्षामध्ये फक्त आबासाहेब (आ.गणपतराव देशमुख) म्हणणाऱ्यांचीही संख्या मोठी आहे. पक्षीय उमेदवार बदलला तर सामान्य मतदार नव्या उमेदवारास स्वीकारतील का हे महत्वाचे आहे.  

जर आमदार देशमुख निवडणुक लढविणार नसतील तर माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील यांची भुमिका महत्वाची असणार आहे. साळुंखे-पाटील यांनी आमदार देशमुखांसाठी विधानसभेच्या निवडणुकीतुन माघारी घेवुन अनेकवेळा त्यांना मदत केली आहे. राष्टवादी कॉंग्रेसकडुन निश्चितपणे ते यावेळी निवडणुकीच्या रिंगणात उतरतील. या अगोदर त्यांनी विधानसभा लढविली नसली तरी त्यांचा जणसंपर्क मोठा आहे. कार्यकर्त्यांसाठी अधिकवेळ ते पक्षकार्यालयात असतात. निवडणुकीसाठी त्यांनी आतापासुनच तयारीही सुरु केली आहे. माजी आमदार शहाजीबापु पाटील हे आमदार देशमुखांचे विधानसभा निवडणुकीतील कट्टर प्रतिस्पर्धी मानले जातात. शहाजीबापुंना मानणारा मोठा वर्गही तालुक्यात आहे. परंतु सतत पक्ष बदल व जणसंपर्काचा अभाव हे त्यांच्या कार्यकर्त्यांना सतावतो आहे. सध्या ते शिनसेनेत असले तरी विधानसभेच्या निवडणुकीत दुसऱ्या पक्षातही जातील अशी चर्चा सुरु आहे. पक्षीय राजकारणात बापुंचे सतत तळ्यात- मळ्यात सुरु असते. बापुंचा गट तालुक्यात कार्यरत असला तरी जणसंपर्काअभावी नवीन लोक बापुंकडे गेलेले दिसत नाहीत. श्रीकांत देशमुख भाजपामध्ये गेल्यापासुन त्यांना मोठी ताकद मिळाली आहे. भाजप सत्याधारी पक्ष असल्याने तालुक्यातील छोट्या-मोठ्या कामासाठी, विकासनिधी मिळविण्यासाठी त्यांचे सतत मुंबई दौरे सुरु असतात. तालुक्यातील कार्यकर्त्यांची कामे करण्यासाठी सतत व्यस्त असतात. यावेळेही ते भाजपाकडुन निवडणुक लढवतील असे मानले जात आहे. शहाजीबापुंनी कॉंग्रस सोडल्यापासुन तालुक्यातील कॉंग्रेसची मोठी ताकत कमी झाली आहे. कॉंग्रेसकडून आयत्यावेळेस कोणीही निवडणुक लढवू शकते. कॉंग्रेस- राष्ट्रवादी यांच्या युतीवर हे अवलंबुन आहे. तालुक्यातील काही नवीन तरुण नेतेमंडळी आमदारकीचे स्वने पाहत आहेत. परंतू सध्या मात्र आमदार गणपतराव देशमुख यावेळेस निवडणूक लढवतील की नाही, त्यावेळच्या पक्षीय आघाड्या कशा असतील यावरच विधानसभेचे राजकीय चित्र स्पष्ट होणार आहे.

सोशल मीडियावर भावी आमदारांची संख्या आधिक 
सध्याचे युग हे सोशल मीडियाचे असले तरी राजकारणासाठिही याचा मोठा वापर होत आहे. सोशल मीडियावर तालुक्यात भावी आमदारांचे अनेक अकाऊंट फिरत आहेत. स्वत:च्या नावापुढे भावी आमदार संबोधुन मतदारांशी संपर्क केला जात आहे. सध्यातरी तालुक्यात भावी आमदारांशी संख्या सतत वाढत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com