शेतकऱ्यांच्या नावावर एवढी रक्कम जमा 

mANGLVEDHA
mANGLVEDHA

मंगळवेढा (सोलापूर) : ऑक्‍टोबर महिन्यात परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी पहिल्या टप्यातील प्राप्त तीन कोटी 19 लाख 73 हजार 644 रुपयांचा निधी 27 गावांतील सहा हजार 677 शेतकऱ्यांच्या थेट बॅंक खात्यावर जमा करण्यात आला. शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर निधी जमा करण्यात मंगळवेढा तहसील कार्यालय अव्वल ठरले. 

हेही वाचा : नागरिकत्व दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजुर
सरकारकडून पहिला टप्पा

परतीच्या पावसाने नुकसान केल्यानंतर तहसीलदार स्वप्नील गावडे यांनी तत्काळ ग्रामसेवक, तलाठी आणि कृषी सहायक यांना आदेश देऊन त्यांच्या माध्यमातून जिरायत, बागायत व फळपिकांचे 17 हजार हेक्‍टर नुकसानीचे जवळपास 11 कोटी रुपयांचे पंचनामे करून नुकसान निश्‍चित झाल्यानंतर 11 कोटी निधीची मागणी जिल्हाधिकारी कार्यालयाला करण्यात आली. शासनाने पहिल्या टप्प्यात तीन कोटींचा निधी पाठवला होता, त्या उपलब्ध निधीचे तत्काळ वाटप केले.
हेही वाचा : विषबाधा झाल्याने दोन मुलांचा मृत्यू 
उर्वरित निधी प्राप्त झाल्यानंतर 

शासनाकडून प्राप्त झालेल्या निधीचे वाटप केले असून उर्वरित निधी प्राप्त झाल्यानंतर तो देखील शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर जमा करण्यात येईल. 
- स्वप्नील रावडे, तहसीलदार 
हेही वाचा : मित्राकडे जेवण करुन घराकडे निघाला अन्‌...
गावातील शेतकरी संख्या व कंसात रक्कम याप्रमाणे 

खोमनाळ 378 (2072176), फटेवाडी 89 (392152), भाळवणी 263 (1254558), हिवरगाव 147 (642440), डिकसळ 209 (1059600), आंधळगाव 350 (1501120), जुनोनी 261 (1177104), जालीहाळ 272 (999800), लक्ष्मीदहिवडी 581 (2218400), माळेवाडी 113 (500000), सोड्डी 281 (1405600), सलगर बुद्रूक 276 (1770800), सलगर खु. 353 (1473300), आसबेवाडी 70 (225200), बावची 369 (1706960), जंगलगी 189 (991600), पौट 253 (1360880), लवंगी 91 (284800), महमदाबाद हु. 111 (209680), मुंढेवाडी 385 (2253276), सिद्धापूर 450 (3318600), तांडोर 267 (1437200), अरळी 482 (1743358), कर्जाळ 96 (50664), लमाणतांडा 149 (653200), येड्राव 156 (651200), मल्लेवाडी 37 (164000). महाराष्ट्र

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com