पोलिस उपायुक्‍त यशोदा वंटगुडी यांची बदली; 'हे' आहेत नवे पोलिस उपायुक्‍त

अमृत वेताळ
Saturday, 8 August 2020

तत्कालिन पोलिस उपायुक्‍त महानिंग नंदगावी यांच्या जागी यशोदा वंटगोडी यांनी गतवर्षी 4 मार्चला गुन्हे तपास आणि वाहतूक विभागाची सुत्रे स्वीकारली होती.

बेळगाव : शहराच्या गुन्हे तपास आणि वाहतूक विभागाच्या पोलिस उपायुक्‍त यशोदा वंटगुडी यांच्या बदली आहे. त्यांच्या जागी नुतन पोलिस उपायुक्‍त म्हणून चंद्रशेखर निलगार यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. 

शुक्रवारी (ता.7) राज्य सरकारने राज्यातील केएसपीएस अधिकाऱ्यांचा बदल्यांचा आदेश जारी केला आहे. त्यामध्ये श्रीमती वंटगोडी यांचा समावेश आहे. 

तत्कालिन पोलिस उपायुक्‍त महानिंग नंदगावी यांच्या जागी यशोदा वंटगोडी यांनी गतवर्षी 4 मार्चला गुन्हे तपास आणि वाहतूक विभागाची सुत्रे स्वीकारली होती. याकाळात त्यांनी रखडलेल्या गुन्ह्यांच्या तपासाला प्राधान्य देण्याबरोबरच वाहतूक विभागाला शिस्त लावण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, कौटुंबीक कारणासाठी त्यांनी आपली बदली लोकायुक्‍त पोलिस प्रमुख म्हणून करुन घेतली आहे. त्यांच्या जागी सध्या खानापूर पोलिस प्रशिक्षक केंद्रात कार्यरत असलेले चंद्रशेखर निलगार यांची नियुक्‍ती झाली आहे. ते उद्या आपल्या पदाची सुत्रे स्वीकारणार आहेत. 

हे पण वाचाएकेकाळी या गावात होता दुष्काळ, पण आज प्रत्येकाच्या घरासमोर आहे रुबाबदार बुलेट 

 

संपादन - धनाजी सुर्वे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Deputy Commissioner of Police Yashoda Vantagodi transferred