उपसरपंचानेच केली सावकारकीला कंटाळून आत्महत्या

bhosale
bhosale

फलटण (सातरा) : खाजगी सावकारकीच्या त्रासाला कंटाळुन होळ (ता.फलटण) गावचे विद्यमान उपसरपंच विनोद बबन भोसले (वय 38 रा. होळ ता.फलटण) यांनी खुंटे- जिंती रस्त्यावर खुंटे गावच्या हद्दीत एका जांभळीच्या झाडाला गळफास घेवुन आत्महत्या केली असून या बाबत फलटण ग्रामीण पोलिस स्टेशनला 5 जणांविरोधात खाजगी सावकारकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत फलटण ग्रामीण पोलिस स्टेशनला संजय बबन भोसले (रा.होळ ता.फलटण) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, विनोद बबन भोसले हा (ता. 17) सकाळी अकराच्या सुमारास घरातुन बारामतीला दवाखान्यासाठी जातो म्हणुन गेला होता. त्याचा दिवसभर कोणालाच फोन आला नाही म्हणुन त्याच्या पत्नीने सायं 6:30 वा. फोन केला असता फोन उचलला होता. त्यांनतर सायं 7:30 वा.फोन केला असता फोन स्वीच ऑफ लागला. परत रात्री दहापर्यंत फोन लागला नाही. विनोद भोसलेचा फोन ही घरी कोणाला आला नाही त्यावर शोधाशोध सुरू केली असता जिंती खुंटे रस्त्यावर खुंटे गावच्या हद्दीत जिंती बाजुकडच्या रस्त्यावर डाव्या बाजुला त्यांची मोटर सायकल क्रमांक ( एम.एच.11 बीएस 6296) लावलेली दिसुन आली यावर विनोदचा आजुबाजुला शोध घेतला असता रस्स्त्याच्या उजव्या बाजुस 200 फुटावर जांभळीच्या झाडाला विनोदने गळफास घेतल्याचे दिसुन आले.

यावर पोलिसांना माहिती दिली असता घटनास्थळी पोलिसांना विनोदच्या खिशातील मोबाईलच्या कव्हर मध्ये चिठ्ठी मिळाली ज्यात खाजगी सावकारकीचा त्रास असे लिहिले होते. यामध्ये रविराज राजाराम घनवट (रा.रामपार्क अर्पाटमेंट जाधववाडी ) यांचकडुन 3 लाख रू.15 टक्के व्याजाने घेतलेले व व्याजाची रक्कम 9 लाख 20 हजार झालेचे लिहीले आहे. 2) बाळु मुंकुदा कोळेकर (रा.कोर्‍हाळे खुर्द चव्हणवस्ती ता.बारामती जि.पुणे ) यांचेकडुन 10 टक्क्याने 3 लाख रूपये घेतल्याचे व व्याज 7 लाख झालेचे लिहिले आहे. ३) अनिल चांदगुडे (रा.जिंती नाका फलटण)  यांचेकडुन 1 लाख, 50 हजार रूपये  व व्याजाचे 3 लाख झालेचे लिहीले आहे. रविंद्र हरिभाऊ काकडे (रा.मंगळवार पेठ फलटण) यांचेकडुन 2 लाख रू व्याजाने घेतल्याचे व व्याजाचे 3 लाख 88 हजार झाल्याचे लिहीले आहे तसेच रविंद्र हरिभाऊ काकडे यांचा मुलगा मोबाईल वरून फोन करून त्रास देत असले बाबत लिहीले आहे. विनोद हणमंत चव्हाण (रा.शेरेवाडी ढवळ ता.फलटण)  यांचेकडुन 2 लाख रू व्याजाने घेतल्याचे व व्याजाचे 3 लाख रू.झाल्याचे लिहीले आहे.

चिठ्ठीतील पाठीमागील बाजुस वरील सर्व लोकांकडे बॅकाचे चेक व गाडीची कागदपत्रे ठेवल्याचे लिहीलेले असुन सर्व पैसे देवुन सुध्दा भयंकर मानसिक त्रास होत असल्याचे लिहीले आहे. या बेकादेशीर खाजगी सावकारांकडुन घेतलेले कर्ज व त्यापोटी झालेल्या व्याजा पोटी तगादा लावला त्यामुळे विनोद भोसले यांचे जगणे असाह्य झाल्याने खाजगी सावकारांकडुन मागील एक वर्षापासुन होणार्‍या मानसिक त्रासातुन कंटाळुन विनोद भोसले यांनी आत्महत्या केली असल्याचे संजय भोसले यांनी  फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी वरील ५ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असुन अधिक तपास पोलिस निरीक्षक सजन हंकारे करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com