कासेगावच्या देशमुखांनी मुलीला सासरी पाठवले हेलिकॉप्टरमधून

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 नोव्हेंबर 2019

- पाठवणीचा हा आगळावेगळा सोहळा पाहण्यासाठी गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली

- मुलगी मंजुळा बीडीएस झाली आहे

- मंजुळा हिचा उद्या (ता. 20) उस्मानाबाद येथे विवाह सोहळा आयोजित केला

पंढरपूर : आजही समाजात जन्माला आलेल्या मुलीचा तिस्कार केला जातो. अनेक वेळा मुलींचा जीव गर्भातच घेतला जातो. अशा वेळी समाजात मुलींविषयी जागृती निर्माण व्हावी. त्याचबरोबर तिचा सन्मान देखील व्हावा या सामाजिक जाणिवेतूनच कासेगाव (ता. पंढरपूर) येथील विजयसिंह देशमुख व जयसिंह देशमुख यांनी अनुक्रमे आपल्या पुतणी व मुलीची आज हेलिकॉप्टरमधून विवाहासाठी सासरी पाठवणी केली. पाठवणीचा हा आगळावेगळा सोहळा पाहण्यासाठी गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती.

हेही वाचा : या मातेचे कृत्य पाहून लावाल डोक्याला हात, स्वतःचीच मुलगी दाखविण्यासाठी...

हौसेला मोल नसतं असं आपल्याकडे आजही म्हटलं जातं. परंतु हौसेबरोबरच मुलीप्रती असलेला जिव्हाळा आणि प्रेम देखील देशमुख कुटुंबीयाने दाखवून दिले आहे. कासेगाव (ता. पंढरपूर) येथील शेतकरी विजयसिंह देशमुख यांची पुतणी आणि जयसिंह देशमुख यांची मुलगी मंजुळा बीडीएस झाली आहे. पहिल्यापासूनच मुलींवर प्रेम करणारे आणि महिलांचा सन्मान करणारे कुटुंब म्हणून देशमुखांची कासेगाव परिसरात ओळख आहे.

 

हेही वाचा :  सर्व दुःख विसरून संत नामदेव पालखी सोहळा सुरू राहील

मंजुळा हिचा उद्या (ता. 20) उस्मानाबाद येथे विवाह सोहळा आयोजित केला आहे. या विवाह सोहळ्यासाठी देशमुख कुटुंबीयाने आज आपल्या मुलीचा सन्मान म्हणून तिची चक्क हेलिकॉप्टरमधून उस्मानाबाद येथे सासरी पाठवणी केली. मुलीच्या पाठवणीचा हा आगळा वेगळा आणि भावनिक सोहळा पाहण्यासाठी गावातील महिला व पुरुषांनी मोठी गर्दी केली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Deshmukh from Kasegaon sent his salon by helicopter