राजेंद्रअण्णा देशमुख भविष्यात पडळकर यांचे नेतृत्व मानणार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 फेब्रुवारी 2017

दिघंची - माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांनी भाजपच्या गोपीचंद पडळकर यांच्यासमोर मान झुकवली. भविष्यात पडळकरांच्या नेतृत्वाखाली राजेंद्रअण्णा काम करणार म्हणून मला अण्णाची काळजी वाटते. त्यांनी भाजप चुकीचा पक्ष निवडला. भविष्यात ते पुन्हा राष्ट्रवादीत येतील, त्यांना हणमंतराव देशमुख यांचे नेतृत्व मान्य करावे लागेल, अशी टीका माजी मंत्री जयंत पाटील यांनी माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांच्यावर केली. दिघंची गटातील प्रचारार्थ झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. 

श्री. पाटील म्हणाले, ""राजेंद्रअण्णा भाजपात गेले याचे दु:ख नाही. त्यांनी अचानक असे का केले, याचे दु:ख आहे. सत्ता गेल्यावर भ्यायचं नसतं, तर जिद्दीने सत्ता परत मिळवायची असते. तरच जनता खंबीरपणे मागे उभी राहते. भाजपाचे धोरण कापूस, डाळिंब, उत्पादन विरोधात आहे. टेंभूला खरा विरोध भाजपनेच केला. राष्ट्रवादीला साथ द्या.'' 

राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हणमंतराव देशमुख म्हणाले, ""ज्या पक्षाने कारखाना, सूतगिरणी व जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद दिले, अशा पवारसाहेबांचा अण्णांनी विश्वासघात केला. तिथे गोपीचंद पडळकर यांचे काय. आम्ही जातीयवाद्यांबरोबर जाणार नाही. पडत्या काळात पक्षाची साथ सोडणार नाही.'' 

माजी पं. स. सभापती सौ. जयमाला देशमुख, राहुल फडतरे, हृषीकेश गुरव, बबन जावीर, राजकुमार पडळे यांनी मनोगत व्यक्त केले. 

सरपंच सौ. नंदाताई बुधावले, बळीराम रणदिवे, अर्जुन काटकर, बाबूराव जाधव, कल्लाप्पा कुटे, अरुण टिंगरे, रोहित देशमुख, मल्हारी बुधावले, ऋतुराज देशमुख, संभाजी ढोक व ग्रामस्थ उपस्थित होते. 

महसूल नव्हे, प्रवेश मंत्री 

"चंद्रकांत पाटील हे मंत्रिमंडळात महसूल मंत्री आहेत की भाजपात प्रवेश देणारे मंत्री आहेत. प्रत्येकाला पक्षाची दारे खुली केली आहेत.' या जयंत पाटील यांच्या विधानावर एकच हशा पिकला. 

Web Title: Deshmukh true leadership in the future