शासन निर्णयाला हरताळ, विद्यार्थ्यांकडून 100 टक्‍के घेतली फी 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

सोलापूर : शासन निर्णयानुसार मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना 50 टक्‍के फी सवलत देणे बंधनकारक आहे. परंतु, सोलापुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयानेच शासन निर्णयाला बगल देत सर्वच विद्यार्थ्यांकडून 100 टक्‍के फी घेतली आहे. सकल मराठा समाजाच्या समन्वयकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतल्यानंतर वैद्यकीय महाविद्यालयाने 30 ऑगस्टपर्यंत संपूर्ण विद्यार्थ्यांची फी परत करण्याचे लेखी आश्‍वासन दिले. सोलापुरातील डॉ. वैश्‍यंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यायात प्रथम वर्षात 150 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

सोलापूर : शासन निर्णयानुसार मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना 50 टक्‍के फी सवलत देणे बंधनकारक आहे. परंतु, सोलापुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयानेच शासन निर्णयाला बगल देत सर्वच विद्यार्थ्यांकडून 100 टक्‍के फी घेतली आहे. सकल मराठा समाजाच्या समन्वयकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतल्यानंतर वैद्यकीय महाविद्यालयाने 30 ऑगस्टपर्यंत संपूर्ण विद्यार्थ्यांची फी परत करण्याचे लेखी आश्‍वासन दिले. सोलापुरातील डॉ. वैश्‍यंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यायात प्रथम वर्षात 150 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यापैकी सुमारे 74 विद्यार्थी मराठा समाजातील असून वार्षिक 8 लाख रुपयांचे उत्पन्न असलेले सुमारे 60-65 विद्यार्थी आहेत.

वास्तविक पाहता राज्यभर आंदोलने सुरु असताना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडूनच शासन निर्णयाची पायमल्ली झाल्याची बाब दुर्दैवी आहे. त्यामुळे शासन निर्णयानुसार संबंधित पात्र विद्यार्थ्यांना 50 टक्‍के फी परत करा, अन्यथा महाविद्यालयासमोर ठिय्या आंदोलन करु, असा इशारा सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी दिल्यानंतर महाविद्यालयातर्फे फी परत करण्याचे आश्‍वासन देण्यात आले. 

शासन निर्णयानुसार राज्यातील सर्व महाविद्यालयांनी मराठा समाजातील 8 लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असणाऱ्या विद्यार्थ्यांना 50 टक्‍के फी सवलत देणे बंधनकारक आहे. परंतु, अद्यापही त्याची अंमलबजावणी काही महाविद्यालयांकडून झालेली नाही. त्यामुळे आता अशा महाविद्यालयांचा शोध घेऊन त्याठिकाणी आंदोलन करण्यात येईल.
 
- माऊली पवार, समन्वयक, सकल मराठा समाज 

शासनाच्या फी सवलतीच्या निर्णयानुसार वैद्यकीय महाविद्यायात एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या खुल्या प्रवर्गातील पात्र सर्व विद्यार्थ्यांचे 50 टक्‍के शैक्षणिक शुल्क 30 ऑगस्टपर्यंत परत केले जाईल.
 
- डॉ.सुनिल घाटे, अधिष्ठाता, डॉ. वैश्‍यंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय

Web Title: Despite the concession in fees Students paid 100 percent fee