दुष्काळ असला तरी, भाजपाचीच सत्ता येणार - शिवाजी कर्डिले
राहुरी - दुष्काळ असला तरी, भाजपाचीच सत्ता येणार आहे. चिन्हाच्या संभ्रमात राहू नका. गुळणी धरु नका. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना काँग्रेसमध्येच राहू द्या. विळद घाटात बंगला बांधून, राहायला या. भाजपाची उमेदवारी घ्या." अशी ऑफर आमदार शिवाजी कर्डिले यांनी डॉ. सुजय विखे पाटील यांना पुन्हा दिली.
राहुरी - दुष्काळ असला तरी, भाजपाचीच सत्ता येणार आहे. चिन्हाच्या संभ्रमात राहू नका. गुळणी धरु नका. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना काँग्रेसमध्येच राहू द्या. विळद घाटात बंगला बांधून, राहायला या. भाजपाची उमेदवारी घ्या." अशी ऑफर आमदार शिवाजी कर्डिले यांनी डॉ. सुजय विखे पाटील यांना पुन्हा दिली.
आज (सोमवारी) तनपुरे साखर कारखान्याच्या गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी आ. कर्डिले बोलत होते. पद्मश्री विखे पाटील कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील, कारखान्याचे अध्यक्ष उदयसिंह पाटील, उपाध्यक्ष शामराव निमसे, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष रावसाहेब (चाचा) तनपुरे, तानाजी धसाळ, शिवाजी गाडे, सुरेश करपे, नामदेव ढोकणे उपस्थित होते.
आ. कर्डिले म्हणाले, "यावर्षी तीव्र दुष्काळ आहे. त्यावर मात करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार आहे. मुळा धरणातून जायकवाडीला पाणी सोडू नये. शेतकऱ्यांना यावर्षीही शंभर टक्के कर्जमाफी द्यावी. शेतकऱ्यांचे वीजबिल माफ करावे. पिण्याच्या पाणी योजनांचे वीज बिल माफ करावे. अशा मागण्या करणार आहे. दुष्काळावर मात करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारतर्फे नियोजन केले जाईल. त्यामुळे, दुष्काळ असला. तरी, भाजपाची सत्ता केंद्रात व राज्यात येईल. आमदार अरुणकाका जगताप यांना लोकसभेची उमेदवारी देण्याचे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी संकेत दिले. परंतू, पवार बोलतात एक. करतात दुसरेच. असा अनुभव आहे. पुण्याच्या जागेतील अदलाबदल करुन, कॉंग्रेसला नगरची जागा सोडू शकतात. त्यामुळे कुकडीच्या गळीत हंगामात आमदार जगताप यांना मदत करु. असे म्हंटले होते. डॉ. सुजय विखे पाटील यांनी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी द्यावी. सत्ताधारी पक्षाचे तिकीट घ्यावे. नगरला रहायला यावे. म्हणजे, उत्तेरेतील उमेदवार म्हणून, त्यांच्यावर कुणी बोट ठेवणार नाही. भाजपाची उमेदवारी घ्यावी. चिन्हाचा संभ्रम दूर करावा. विरोधी पक्षेनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना कॉंग्रेसमध्येच राहू द्यावे." अशी खुली ऑफर कर्डिले यांनी दिली.