सोलापूर - एफेड्रीन नष्ट करण्यासाठी पथक दाखल 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 जून 2018

सोलापूर : चिंचोळी एमआयडीसीमधील एव्हॉन कंपनीत सापडलेले 23 टन एफेड्रीन नष्ट करण्यासाठी ठाणे पोलिसांचे पथक सोलापुरात दाखल झाले आहे. या आठवड्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत एफेड्रीन नष्ट करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

एप्रिल 2016मध्ये ठाण्यात कारमधून एफेड्रीन घेऊन जाताना पोलिसांनी एकाला पकडले होते. संशयित असलेल्या सागर पोवळे व मयूर सुखदरे यांच्याकडे चौकशी करण्यात आली. त्यानुसार सोलापुरातील एव्हॉन कंपनीतील धानेश्‍वर स्वामी, राजेंद्र डिमरी यांच्याकडे चौकशी केल्यानंतर हे रॅकेट एफेड्रीनची अंमली पदार्थ म्हणून विक्री होत असल्याचे उघडकीस आले होते. याप्रकरणी अभिनेत्री ममता कुलकर्णी, विकी गोस्वामी या दोघांसह अनेक मोठी मंडळींवर गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्याचा तपास विशेष पथकाकडून चालू आहे.

कंपनीत सापडलेले 23 टन इफेड्रीन नष्ट करण्यासाठी ठाणे पोलिसांनी न्यायालयात अर्ज दाखल केले होते. त्यास परवानगी मिळाली असून या आठवड्यात एफेड्रीन नष्ट करण्यात येणार आहे. यासाठी ठाणे पोलिसांचे पथक सोलापुरात दाखल झाले आहे. या आठवड्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत एफेड्रीन नष्ट करण्यात येईल. एफेड्रीन कशा पद्धतीने नष्ट करण्यात येईल हे अद्याप समजले नाही.

Web Title: to destroy Ephedrine the squad enter