शेतात रोटाव्हेटर फिरवून कोबी-फ्लॉवरचे पीक केले उद्‌ध्वस्त 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 एप्रिल 2018

आश्‍वी - शेतमालाला हमीभाव नसल्याने शेतमाल बाजारात नेण्याचा खर्चही निघत नाही. यामुळे त्रस्त झाल्याने संगमनेर तालुक्‍यातील आनंदवाडी (चंदनापुरी) येथील शेतकरी मुरलीधर सरोदे यांनी चार एकर कोबी व फ्लॉवरच्या उभ्या पिकात रोटाव्हेटर चालवून आपला संताप व्यक्त केला. 

सरोदे यांनी त्यांच्या कोबी व फ्लॉवरच्या पिकासाठी सुमारे दोन लाख रुपये खर्च केला होता. अधिक उत्पादनामुळे या हंगामात कोबी व फ्लॉवरचे बाजारभाव कोसळले. संगमनेरच्या बाजारपेठेत एका क्रेटला फक्त 20 रुपये मिळतात. त्यासाठी एका क्रेटचे 15 रुपये भाडे व नगरपालिका करापोटी 5 रुपये द्यावे लागतात. अंगमेहनत करून शेतातून काढलेला माल बाजारात शून्य किमतीला विकण्यापेक्षा वैतागलेल्या सरोदे यांनी रोटाव्हेटर चालवून पीक उद्‌ध्वस्त केले.

Web Title: Destroyed cabbage-flower