राजकीय हुकूमशाही उखडून  टाकण्याचा निर्धार : गीताकुमारी

 Determined to overthrow political dictatorship: Gita Kumari
Determined to overthrow political dictatorship: Gita Kumari

श्रीरामपूर : ""स्वातंत्र्याच्या आंदोलनात केवळ राजकीय स्वातंत्र्याला महत्त्व दिले. परंतु आज नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरुद्ध सुरू असलेल्या लढ्यात राजकीय हुकूमशाही उखडून टाकण्याचा निर्धार देशातील प्रत्येक तरुणाने करावा,'' असे आवाहन जेएनयू (जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, दिल्ली) विद्यार्थी संघाच्या माजी अध्यक्ष गीताकुमारी यांनी केले.

 सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात येथील संविधान बचाव समितीतर्फे सुरू केलेल्या धरणे आंदोलनातील सभेत गीताकुमारी बोलत होत्या. ऑल इंडिया विद्यार्थी संघटनेचे महासचिव संदीप सौरव, आमदार लहू कानडे उपस्थित होते. गीताकुमारी म्हणाल्या, ""स्वातंत्र्याच्या आंदोलनात ब्राह्मणवादाचा भाग असलेल्या जातीवाद, पुरुषसत्ता यांच्याविरोधात संघर्ष झाला नाही. त्यामुळे आजही स्त्रिया व मागास जातींवर ज्ञानबंदी व बहिष्कार कायम राहिला आहे.

लढाईचे नेतृत्व महिलांहाती

देशात आजही स्त्रिया व मागास जातींची अवस्था उच्चवर्णीयांच्या तुलनेत खालावलेली आहे; परंतु नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या निमित्ताने सुरू असलेल्या लढाईचे नेतृत्व महिलांनी हाती घेतले आहे. मागील पिढीने केलेली चूक आताची पिढी पुन्हा होऊ देणार नाही. महिलांच्या पुढाकाराने आज संपूर्ण देशात नागरिकतेशी संबंधित लढाई सुरू आहे. विद्यापीठात महिलांचे नेतृत्व सिद्ध झाले असून, या आंदोलनाची धग देशभरात पसरवण्याचा प्रयत्न सुरू आहे.'' 

घटनेच्या तत्त्वाला तडा गेला

आमदार कानडे म्हणाले, ""घटनाकारांनी वर्ण, जात, लिंग आदी भेदभावापासून घटना मुक्त राहील, याची काळजी घेतली. परंतु धर्म विचारून नागरिकता देणाऱ्या कायद्यामुळे घटनेच्या तत्त्वाला तडा गेला आहे. जनता घटनेच्या रक्षणासाठी कटिबद्ध असून, जनतेच्या आक्रोशामुळे केंद्र सरकारला माघार घ्यावी लागेल.'' 
राजेंद्र बावके, दिशा शेख, रावसाहेब मोहन, डॉ. सुधीर क्षीरसागर यांची भाषणे झाली. सचिन गुजर, अहमद जहागीरदार, जीवन सुरुडे, मुजफ्फर शेख, अंजूम शेख, मुख्तार शहा, मुन्ना पठाण, नागेश सावंत यांनी आंदोलनात सहभाग घेतला आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com