सामान्यांच्या विकासात बॅंकांचे योगदान मोलाचे - नितीन गडकरी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 डिसेंबर 2018

वाई - पुणे जिल्हा नागरी सहकारी बॅंक्‍स असोसिएशनने उत्कृष्ट काम करणाऱ्या नागरी सहकारी बॅंकांचा गौरव करून नवीन पायंडा पाडला आहे. सहकारी बॅंका थेट सामान्य जनतेची सेवा करीत असल्याने सर्वसामान्यांच्या आर्थिक विकासात त्यांचे योगदान मोलाचे आहे, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी केले. 

राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे आयोजित उत्कृष्ट नागरी सहकारी बॅंकांच्या गौरव कार्यक्रमात ते बोलत होते. त्यांच्या हस्ते पश्‍चिम महाराष्ट्रात सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व आर्थिक सक्षम व उत्कृष्ट व्यवस्थापन असलेल्या दि वाई अर्बन बॅंकेचा गौरव करण्यात आला. बॅंकेचे अध्यक्ष सी. व्ही. काळे यांनी या पुरस्काराचा स्वीकार केला. याप्रसंगी उपाध्यक्ष राजेंद्र चावलानी, संचालक सीए किशोरकुमार मांढरे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीपाद कुलकर्णी उपस्थित होते. 

वाई अर्बन बॅंकेस पुरस्कार मिळाल्याबद्दल मंत्री सुभाष देशमुख, भाजपचे पुण्यातील खासदार अनिल शिरोळे, पुणे जिल्हा नागरी सहकारी बॅंक्‍स असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. सुभाष मोहिते, राज्य सहकारी बॅंक्‍स फेडरेशनचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर, वाई अर्बन परिवाराचे पोपटलाल ओसवाल, अरुण देव, डॉ. सुधीर बोधे, अविनाश जोशी, बॅंकेचे संचालक डॉ. विनय जोगळेकर, मदनलाल ओसवाल, विवेक भोसले, सीए राजगोपाल द्रवीड, विद्याधर तावरे, मनोज खटावकर, प्रा. विष्णू खरे, भालचंद्र देशपांडे, डॉ. शेखर कांबळे, स्वरूप मुळे, संचालिका अजली शिवदे, गीता कोठावळे व वाईतील मान्यवरांनी अभिनंदन केले.

Web Title: Development Bank Help Nitin Gadkari