esakal | आचारसंहितेत अडकणार सातारा जिल्ह्याचा "विकास'
sakal

बोलून बातमी शोधा

आचारसंहितेत अडकणार सातारा जिल्ह्याचा "विकास'

त्यामुळे आता मुदत संपणाऱ्या आमदारांना कामे सुचवावी लागणार आहेत. 

आचारसंहितेत अडकणार सातारा जिल्ह्याचा "विकास'

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सातारा : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता गणेशोत्सवानंतर लागणार आहे. नियोजन समितीतून यापूर्वी मंजूर झालेली कामे मार्गी लागतील. पण, नव्याने हाती घेतलेली कामे आचारसंहितेत अडकणार आहेत. त्यासोबतच आमदारांची मुदतही संपणार आहे. त्यामुळे मुदत संपलेल्या तसेच राजीनामा दिलेल्या आमदारांचा उर्वरित निधी खर्च कसा होणार, यावर आता नियोजन समितीने लक्ष दिले आहे. 
मुदत संपणाऱ्या सर्वच आमदारांनी कामे सुचविल्याशिवाय त्यांचा निधी खर्च होणार नाही. जिल्हा नियोजन समितीला मिळालेला निधी पुढील वर्षी खर्च करता येतो. त्यामुळे हा निधी परत जात नाही. पण, आता विधानसभेची आचारसंहिता लागू होणार असल्याने आमदार निधीचा खर्च कसा होईल, याकडे नियोजन समितीने लक्ष दिले आहे. सध्या नियोजन समितीत यापूर्वी मंजुरी मिळालेल्या कामांवर निधी खर्च करण्याचे काम सुरू आहे. ही मंजूर कामांची पुढील निविदा प्रक्रिया व इतर प्रक्रिया आचारसंहितेतही सुरू राहणार आहे. त्यामुळे ही कामे अडकणार नाहीत. आता ज्या आमदारांनी राजीनामा दिला आहे, त्यांच्या उर्वरित शिल्लक निधीतून कामे होण्यासाठी त्यांनी कामे सुचविणे गरजेचे आहे. अन्यथा हा निधी आचारसंहितेनंतर म्हणजेच पुढील वर्षी खर्च करावा लागणार आहे. जिल्हा नियोजन समितीला या वर्षी जादा निधी मिळाला आहे. त्यामुळे आचारसंहिता संपल्यानंतर विविध विभागांना वाढवून दिलेल्या निधीतून कामे पूर्ण होणार आहेत. खासदार निधीतून विविध कामे सुचवून त्यांना मंजुरीही मिळाली आहे. त्यामुळे ही कामेही येत्या काळात मार्गी लागणार आहेत. आचारसंहिता लागण्यापूर्वी कामांचा निपटारा लावण्यासोबतच अखर्चित निधी खर्च टाकण्यावर नियोजन समितीने भर दिला आहे. त्यामुळे आता मुदत संपणाऱ्या आमदारांना कामे सुचवावी लागणार आहेत. 


दत्तक गावांना निधी जरुरीचा 

यापूर्वी जिल्ह्यातील आमदारांनी तीन-तीन गावे दत्तक घेतली होती. मात्र, त्या गावांत विविध विकासकामे राबविताना आमदारांना स्वत:च्या निधीतून खर्च करावा लागला होता. आता या गावांना आगामी काळात विकासकामांसाठी निधी मिळणार का, हा प्रश्‍न आहे. काही गावांत शासकीय मदतीशिवाय चांगली कामे झाली. आता विद्यमान आमदारांची मुदत संपणार असल्याने या दत्तक गावांत शासनाने निधी टाकणे गरजेचे आहे. कारण नवीन आमदार दुसरी गावे दत्तक घेणार आहेत. 

loading image
go to top