देविखिंडीच्या श्रीकांतची कुस्तीत भरारी

Devkhindi's Shrikant Nikam's success in  wrestling
Devkhindi's Shrikant Nikam's success in wrestling

घरची परिस्थिती बेताची. वडील शेतकरी तरी देखील मुलाला पैलवान बनविण्याची इच्छा मनी. श्रीकांतला पैलवानकीचे धडे देण्यास सुरवात केली. भागात तालमीची सोय नसल्याने मामाच्या गावी कडेपूर येथील तालमीतून कुस्तीचे धडे घेण्यास सुरवात केली. श्रीकांताच्या वडिलाने त्याला मोठा पैलवान करण्याचे स्वप्न उराशी बाळगले. श्रीकांतने वडिलाच्या इच्छापूर्ती करण्यासाठी प्रामाणिकपणे कष्ट घेतले. त्याच कष्टाचे फळ श्रीकांतला पहिल्याच प्रयत्नात मिळाले. जिल्ह्यातून महाराष्ट्र केसरीसाठी निवड झाली. या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्याच्या यशाबद्दल घेतलेला आढावा.. 

डोंगराच्या कुशीत वसलेल्या या गावाला गलाई व्यावसायिकांचे गाव ओळख परिसराला परिचित आहे. मात्र डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्यामुळे जन्मभूमी नावारुपास आली त्याचप्रमाणे यापुढे देविखिंडी गावाला देखील पैलवान श्रीकांत यांच्यामुळे महाराष्ट्रभर नावलौकिक मिळण्यास मदत होणार आहे.

काका पवार तालीम पुणे येथे देविखिंडीचा श्रीकांत सयाजी निकम सराव करत आहेत. पंचक्रोशीतही त्यांचा कुस्तीसाठी नाव घेतले जाते. कडेपूर त्यानंतर काही काळ आटपाडीत सराव केल्यानंतर पुण्यातील नावजलेल्या काका पवार तालमीत श्रीकांत पैलवानकीचे धडे गिरवण्यास सुरवात केली आहे. यासाठी गोविंद पवार यांनी मार्गदर्शन केले. 

63 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या श्रीकांतने सांगली जिल्ह्यासह खानापूर तालुक्‍याचे नाव कुस्ती मैदानात गाजवत कास्य पदकाची कमाई केली. कुस्ती कारकीर्दच्या सुरवातीला कास्य पदक पटकावून भविष्यातील महाराष्ट्र केसरीसाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. त्यांच्या यशाबद्दल जिल्ह्यातील कुस्ती शौकिनासह गावातील लोकांनी आनंदोत्सव साजरा केला.

श्रीकांतचे महाराष्ट्र केसरी किताबाचे स्वप्न दुभंगले असले तरी त्यांनी केलेल्या मेहनतीचे फळ मिळाले असल्याचे त्यांचे वडील सयाजी निकम यांनी सांगितले. त्यांच्या यशाबद्दल आमदार अनिल बाबर, सुहास बाबर, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील, सरपंच जगुताई मंडले, उपसरपंच बबन निकम, प्रशांत सावंत यांच्यासह अनेक मल्ल, मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. 

श्रीकांतला जिंकण्याचा आत्मविश्वास होता. 
श्रीकांत म्हणाला,""मी गेले अनेक वर्षे काकांच्या तालमीत तयार झालो आहे. वडिलांचे कुस्तीवर असलेल्या निष्ठेमुळे कुस्ती कधीही सोडली नाही. काल झालेल्या कुस्तीमध्ये मी डोक्‍याने खेळल्याने मला इथेपर्यंत मजल मारणे शक्‍य झाले. आगामी काळात किताबच्या शर्यतीत पोहोचण्यासाठी कष्ट घेणार असल्याचे त्यांने सांगितले.'' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com