जोतिबा डोंगरावर भाविकांची गर्दी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 ऑक्टोबर 2016

जोतिबा डोंगर - करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीचे दर्शन घेऊन सर्रास भाविकांनी आज श्री क्षेत्र वाडी रत्नागिरी (जोतिबा डोंगर) येथे उपस्थिती लावली. दिवसभरात सुमारे दोन लाख भाविकांनी जोतिबाचे दर्शन घेतले. त्यामुळे डोंगराला आज मिनी चैत्र यात्रेचे स्वरूप आले. आज नवरात्रोत्सवातील दुसरा दिवस. त्यामुळे जोतिबाची सकाळी तीन पाकळी सोहन कमळपुष्पातील खडी सालंकृत महापूजा दहा गावकर तसेच अंकुश दादर्णे, बाळकृष्ण सांगळे, महादेव घुगर, अक्षय ठाकरे, मधुकर सांगळे यांनी बांधली. 

पहाटे श्रींना अभिषेक घातला. या वेळी बंज उमराणी, सूरज उपाध्ये, शरद बुरांडे, खंडू उपाध्ये, गणेश उपाध्ये यांनी केदारसहस्रनाम केदारकवच, केदार महिमाचे पठण केले. सकाळी दहाला उंट, घोडा या मानाच्या प्राण्यांसोबत धुपारती सोहळा मूळ माया यमाई मंदिराकडे मिरवणुकीने गेला. या वेळी पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अधीक्षक लक्ष्मण डबाणे, सिंधीया ट्रस्टचे अधीक्षक आर. टी. कदम व देवसेवक, पुजारी, ग्रामस्थ उपस्थित होते. दुपारी बाराला मुख्य मंदिर परिसरात धुपारती सोहळा झाला. त्यानंतर सुधाकर डबाणे यांनी तोफेची सलामी दिली. त्यानंतर मंदिर दर्शनासाठी खुले केले. रात्री मुख्य मंदिरात हंस भजनी मंडळ, जोतिर्लिंग भजनी मंडळ, महिला भजनी मंडळांचे कार्यक्रम झाले. 

जादा एसटी बसची सोय
एसटी महामंडळाने कोल्हापूर, सांगली, सातारा, कऱ्हाड आगारांतून जादा एस.टी. बसची सोय केली; तर ८ ऑक्‍टोबरला जागरानिमित्त रात्रभर एसटी सेवा ठेवली जाणार आहे. ग्रामपंचीयतीने गावात स्वच्छता, पिण्याच्या पाण्याचा मुबलक पुरवठा केला. सरकारी दवाखाना जोतिबा, केखले आरोग्य केंद्रांनी भाविकांना वैद्यकीय सेवा पुरविली.

Web Title: Devotees throng on Jyotiba mountain

फोटो गॅलरी