माचणूर येथे श्रावण मासानिमित्त सिध्देश्वराच्या दर्शनासाठी भाविकांची रेलचेल

दावल इनामदार
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

ब्रह्मपुरी (सोलापुर) : श्रावण मासानिमित्त तीर्थक्षेत्र माचणूर (ता.मंगळवेढा) येथील श्री सिध्देश्वरच्या दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केली होती. सध्या श्रावण मासा निमित्त येथे भविकांची रेलचेल सुरु आहे. श्रावणातील प्रत्येक सोमवारी हर हर महादेवच्या जयघोषाने परिसर दुमदमून गेला होता.

ब्रह्मपुरी (सोलापुर) : श्रावण मासानिमित्त तीर्थक्षेत्र माचणूर (ता.मंगळवेढा) येथील श्री सिध्देश्वरच्या दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केली होती. सध्या श्रावण मासा निमित्त येथे भविकांची रेलचेल सुरु आहे. श्रावणातील प्रत्येक सोमवारी हर हर महादेवच्या जयघोषाने परिसर दुमदमून गेला होता.

सोलापूरपासून 40 किमी व मंगळवेढ्यापासून 14 किमी अंतरावर भीमा नदीच्या काठावर कड़ेकपारीत सुंदर असे निसर्गरम्य प्राचीन हेमाडपंथी श्री सिध्देश्वराचे मंदिर आहे. मंदिराकड़े डाव्या बाजूस भव्य असे मल्लिकार्जुन मंदिर व उजव्या बाजूस बाबा महाराज आर्विकर यांचा मठ आहे. मंदिरामधे प्रवेश करताच समोरील भागात नंदी, उजव्या बाजूस गणेश मूर्ति व गाभाऱ्या मधे पिंड व सिद्धेश्वराची मूर्ति आहे.मंदिरातून बाहेर येताच असून भीमा नदीच्या पात्रात सुंदर देखणे जटाशंकर मंदिर आहे. अहिल्याबाई होळकर यांनी नदिकडे भव्य असा घाट बांधला आहे. प्राचीन काळी येथे औरंगजेब वास्तव्यास असल्याने मंदिराच्या पूर्व बाजूस भुयकोट किल्ला आहे. निसर्गरम्य असे देवस्थान असल्यामुळे येथे शेकडो भाविक दर्शनासाठी सातत्याने येतात. श्रावण मासातीन दुसरा सोमवार असल्याने पहाटे 4.30 वा.श्रीं ची पुजा केल्यानंतर भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले केले. भीमा नदीच्या पात्रात  पाणी असल्यामुळे भाविकांनी पहाटे अंघोळ करून ओल्या पडद्याने दर्शन घेतले. दिवसभर मंदिर व परिसर भाविकांनी फुलून गेले होते. मंगळवेढा आगार व सोलापूर येथून भाविकांच्या सोयीसाठी एसटीची सोय करण्यात आली होती. मंदिरामध्ये भावगीत, भक्तीगीत असे समुहगीत कार्यक्रम ठेवल्याने परिसर भक्तीमय बनला होता. यामध्ये भजन सम्राट मस्तान मुल्ला, शाहिर जगन्नाथ डोके, पेटीवादक बन्सी मुलाणी, तबलावादक दगडू मुळे, विनावादक बबन सरवळे, परवेज मुलाणी आदींचा यामध्ये समावेश होता. मंदिरामध्ये भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या या मंदिरास महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, गोवा या राज्यतून भाविक मोठ्या प्रमाणात येत असतात. त्यामुळे हा परिसर भक्तिमय वातावरणात फुलून गेला होता.

सिद्धेश्वर मंदिराच्या पुजेसाठी नगारा वाजवण्याचा मान माचणुर येथील मुस्लिम समाजाकड़े आहे.येथील सिद्धेश्वराची पूजा अर्चा करण्याचा मान ब्रह्मपुरीतिल गुरव समाजाकड़े असून प्रत्येक बुधवारी आठवड़ा पाळीप्रमाणे बदलला जातो.

Web Title: the devotees will visit Siddeshwar mandir in Shravan Masanim at Machanur