बेलदार समाज हक्कांसाठी मंत्रालयावर मोर्चा काढणार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 डिसेंबर 2017

देवराष्ट्रे - 'बेलदार समाजाचा देशाच्या विकासात मोठा वाटा आहे. दगड फोडणारा समाज आजही उपेक्षित आहे. जागतिकीकरणाच्या रेट्यात पारंपरिक व्यवसाय मोडकळीस आल्याने समाज बांधवांवर संकट आले.

देवराष्ट्रे - 'बेलदार समाजाचा देशाच्या विकासात मोठा वाटा आहे. दगड फोडणारा समाज आजही उपेक्षित आहे. जागतिकीकरणाच्या रेट्यात पारंपरिक व्यवसाय मोडकळीस आल्याने समाज बांधवांवर संकट आले.

शासन स्तरावर डोळेझाक सुरू आहे. इतर राज्यांप्रमाणे समाजाला ही सवलत मिळणे गरजेचे आहे. शासनाने मागणीची दाखल न घेतल्यास मंत्रालयावर मोर्चा काढणार आहे,'' असे प्रतिपादन महाराष्ट्र बेलदार समाजाचे नूतन अध्यक्ष दिनकरराव मोहिते यांनी केले.

येथे यशवंतराव चव्हाण स्मृती न्यास सभागृहात बेलदार समाजाचा राज्यस्तरीय मेळावा झाला. बाबूराव चव्हाण अध्यक्षस्थानी होते. राज्य बेलदार संघटनेचे अध्यक्ष व कार्याध्यक्षांची निवड झाली. राज्याध्यक्षपदी दिनकरराव मोहिते व कार्याध्यक्षपदी सर्जेराव मोहिते यांची निवड झाली. मेळाव्यासाठी जळगाव, पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, लातूर येथून नागरिक आले होते.

Web Title: devrashtre news rally on mantralaya for beldar society