Loksabha 2019 : साखर सम्राटांना चाळीस चोर म्हणणारे त्यांच्यात जाऊन बसलेत

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 7 एप्रिल 2019

नेर्ले -  शेतकऱ्यांकडून एक एक रुपया गोळा करून शेतकऱ्यांचा विश्वासघात केला. शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसला. साखर सम्राटांना चाळीस चोर म्हणणारे  त्यांच्याबरोबर जाऊन आता 41 चोर झाले असल्याची टीका युतीचे उमेदवार धैर्यशील माने यांनी खासदार राजू शेट्टी यांचे नाव न घेता केली. 

नेर्ले -  शेतकऱ्यांकडून एक एक रुपया गोळा करून शेतकऱ्यांचा विश्वासघात केला. शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसला. साखर सम्राटांना चाळीस चोर म्हणणारे  त्यांच्याबरोबर जाऊन आता 41 चोर झाले असल्याची टीका युतीचे उमेदवार धैर्यशील माने यांनी खासदार राजू शेट्टी यांचे नाव न घेता केली. 

श्री. माने म्हणाले, लोकशाहीला सक्षम उमेदवार निवडून देणे गरजेचे आहे. मी ग्रामपंचायत निवडणुकीपासून या निवडणुकीपर्यंत प्रवास केला आहे. बहुजनांचे, युवकांचे शेतकऱ्यांचे प्रश्न मी मार्गी लावेन शेतकऱ्यांच्या जीवावर जे खासदार झाले  ज्यांनी चिल्लर गोळा केली, साखर कारखानदारांना शिव्या शाप दिले, त्यांनी शेतकऱ्यांचा विश्वासघात केला. मोठ्या गावात काटा बसवण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते, परंतु काटा नाहीच बसला. एका खासदाराला पाच वर्षांमध्ये 50 कोटी रुपये मिळतात. यापैकी एक कोटीपर्यंत गावांमध्ये वजन काटा बसवता आला असता. परंतु ती मानसिकता विद्यमान खासदारांची नाही.

मंत्री सदाभाऊ खोत म्हणाले, मी मंत्री झालो म्हणून त्यांना बरं वाटलं नाही. यांना अगोदर पैसे गोळा करायला डबा लागायचा, पण आता डबा नाही मोठं गडी लागत्यात. त्यामुळे डब्याची गरज नाही हजारो कोटी रुपयांचे पॅकेज कारखानदारांना आमच्या सरकारने दिले.  

सम्राट महाडिक म्हणाले की आमचे पारंपरिक जे लोक शत्रू आहेत, त्यांच्या बरोबर शेट्टी गेले. आम्ही आतबाहेर करीत नाही. जरी आमचे बंधू कोल्हापुरात उभे राहिले असले तरी शेतकरी केंद्र मानून धैर्यशील माने यांना महाडिक युवा शक्ती पाठिंबा देते आहे. 

आमदार उल्हास पाटील, रयत क्रांती संघटनेचे सागर खोत, माजी सरपंच संदीप पाटील, महेश पाटील आदी उपस्थित होते.

 

Web Title: Dhairyasheel mane comment