डी. वाय. पाटील यांच्या आशिर्वादाने कसबा बावड्यात मताधिक्‍य शक्य

डी. वाय. पाटील यांच्या आशिर्वादाने कसबा बावड्यात मताधिक्‍य शक्य

कोल्हापूर - डॉ. डी. वाय. पाटील यांच्या आशीर्वादामुळे कसबा बावड्यातून आपल्याला निश्‍चितपणे मताधिक्‍य मिळेल, असा विश्‍वास खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला. 

कसबा बावडा येथे झालेल्या महिला मेळाव्यात ते बोलत होते. खासदार महाडिक, भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक यांच्या पुढाकाराने उलपे हॉलमध्ये मेळावा झाला.

श्री. महाडिक म्हणाले, ‘‘पक्ष, गट-तट न पाहता पाच वर्षे सर्वसामान्य माणसाच्या विकासासाठी कार्यरत राहिलो. महिलांनी स्वाभिमानाने आणि स्वावलंबी जगावे यासाठी प्रयत्न केले. पाच वर्षांतील विकासकामांची धडपड, नवे प्रकल्प यामुळे डॉ. डी. वाय. पाटील यांनी आपणास आशीर्वाद दिला. त्यांच्या आशीर्वादामुळेच बावड्यातून मला निश्‍चितपणे मताधिक्‍य मिळेल. विमानतळ, कोकण रेल्वे, बास्केट ब्रिज, प्रकल्पांना मंजुरी मिळाली.’’  

सौ. अरुंधती महाडिक म्हणाल्या, ‘‘महिलांसाठी रोजगारपूरक प्रशिक्षण, बचत गटांच्या महिलांना बाजारपेठ, स्वसंरक्षण शिबिर, वाचनालय झिम्मा-फुगडी स्पर्धा, शिलाई यंत्र वाटप, शेळी वाटप असे उपक्रम राबविले. महिलांच्या जीवनात प्रगतीची नवी दिशा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. खासदार महाडिक यांच्या प्रेरणेतून आणि पाठबळामुळेच महिला सक्षमीकरणाची चळवल सुरू झाल्याने महिलांनी महाडिक यांच्या पाठीशी 
उभे राहावे.’’

मंगल महाडिक, मंगल जाधव, कमला जाधव, कमलाकर नेजदार यांनी मनोगतात खासदार महाडिक यांच्या पाठीशी बावडा परिसर निश्‍चितपणे राहील, अशी ग्वाही दिली. प्रियांका उलपे, कोमल साठे, अश्‍विनी आगळे, रूपाली कुंभार, आरती यादव, हरिष चौगले, दिलीप उलपे, प्रदीप उलपे, नगरसेवक सत्यजित कदम, आर. वाय. पाटील, प्रल्हाद उलपे आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com