स्वातंत्रदिनी धनगर समाजाचे कार्यकर्ते घेणार भीमानदीत जलसमाधी

भारत नागणे
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

राज्य शासनाचे उपोषणाकडे लक्ष वेधण्यासाठी उद्या (ता.15) स्वातंत्र्यदिनी येथील भीमानदीवरील अहिल्यापुलावरुन उड्या मारुन आठ धनगर समाज बांधव जलसमाधी घेणार आहेत. या संदर्भात धनगर समाजाचे प्रा. सुभाष मस्के आणि माऊली हळणवर यांनी जाहीर केले आहे. जलसमाधीचा इशारा दिल्याने खळबळ उडाली आहे.

पंढरपूर (सोलापूर) : धनगर समाजाला एसटी प्रवर्गाचे प्रमाणपत्र मिळावे या मागणीसाठी राज्यातील धनगर बांधवांचे पंढरपुरात बेमुदत उपोषण सुरु आहे. आज उपोषणाचा सहावा दिवस आहे. तरीही  शासनाचे उपोषणाकडे दुर्लक्ष असल्याने धनगर समाजामधून नाराजी व्यक्त केली जात आहे.

राज्य शासनाचे उपोषणाकडे लक्ष वेधण्यासाठी उद्या (ता.15) स्वातंत्र्यदिनी येथील भीमानदीवरील अहिल्यापुलावरुन उड्या मारुन आठ धनगर समाज बांधव जलसमाधी घेणार आहेत. या संदर्भात धनगर समाजाचे प्रा. सुभाष मस्के आणि माऊली हळणवर यांनी जाहीर केले आहे. जलसमाधीचा इशारा दिल्याने खळबळ उडाली आहे.

धनगर समाजाला एसटी प्रवर्गाचे प्रमाणपत्र मिळावे, आरक्षणाचा खटला फास्टटॅ्क कोर्टात चालवावा, यासाठी येणारा खर्च राज्य शासनाने करावा अशा विविध मागण्यांसाठी राज्य धनगर आऱक्षण समन्वय समितीचे सदस्य पांडुरंग मेरगळ आणि राम गावडे यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली पंढरपुरात 9 आगस्ट क्रांती दिनापासून राज्य सरकारच्या विरोधात बेमुदत उपोषण सुरु केले आहे.

उपोषणाचा आजच्या सहावा दिवस आहे. उपोषणाला बसलेल्या 9 पैकी पाच जणांची प्रकृती खालावली असून त्यांना हाॅस्पिटलमध्ये हालवण्यात आले आहे. दरम्यान राज्य शासनाचे उपोषणाकर्त्यांकडे लक्ष वेधण्यासाठी येथील समाज बांधवांनी स्वातंत्र्यदिनी भीमानदी पात्रात उडी मारुन जलसमाधी घेणार असल्याचा इशारा दिला आहे. 

धनगर समाज बांधवांच्या या इशारानंतर उपोषण स्थळी पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. जो पर्यंत एसटीचे प्रमाणपत्र हातात पडत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असा इशाराही समन्वय समितीच्या देण्यात आला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dhangar community agitation for reservation on independence day