मंगळवेढ्यात धनगर समाजाचे आंदोलन

हुकूम मुलाणी
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

मंगळवेढा - राज्यातील सकल मराठा समाज आपल्या मागण्यावरुन आक्रमक झाला असतानाच आता तालुक्यातील मोठया प्रमाणात असलेल्या धनगर समाजाने आपल्या प्रलंबित मागण्यासाठी झुलवत ठेवणाऱ्या सरकारविरोधात रस्त्यावर उतरण्यास सुरुवात केली. तालुक्यातील रडडे येथे सर्वप्रथम रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

यावेळी सत्ताधारी भाजप-शिवसेना सरकारचा निषेध व्यक्त करत संपूर्ण गाव बंद ठेवून निषेध करण्यात आला.

यामध्ये अ‍ॅड. रविकिरण कोळेकर, सुनिल थोरबोले, सुनिल कोकरे, संजय कोळेकर, राहुल कांबळे, पोपट कांबळे, बिरुदेव कोळेक, महावीर मेटकरी, योगेश थोरबोले, दत्ता लोखंडे, विजय मेटकरी, अनिल कोकरे, यांच्यासह या समाजातील बांधव मोठया प्रमाणात सहभागी होत रस्त्यावर उतरले.

मंगळवेढा-शिरनांदगी रोडवर रास्ता रोको करण्यात आला आहे. यावेळी अ‍ॅड. रविकिरण कोळेकर यांनी मार्गदर्शन केले रास्ता रोको केल्यामुळे रस्त्यावर दुचाकी वाहनधारकांची मोठया प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली. येळकोट-येळकोट जय मल्हारच्या घोषणा देत सरकार कडून होत असलेल्या विलंबाबाबत या आक्रमक पवित्रा घेतल्याने याचे लोण आता तालुका भर पसरणार असल्याचे दिसत आहे. तालुक्यात हा समाज मोठया प्रमाणात असून, मराठा समाजा खालोखाल हा समाज आहे. या समाजाचकडे दुर्लक्ष केल्यास याचे राजकीय पडसाद भविष्यात निश्‍चीत दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Web Title: Dhangar community movement in the Mangaldas