धनगर समाजाने आरक्षणाच्या लढयासाठी सज्ज रहावे -  गोपीचंद पडळकर

dhangar
dhangar

भोसे - प्रस्थापितांच्या विरोधात बोलण्यास सुरुवात केल्याशिवाय धनगराची क्रांती होवू शकत नाही आणि क्रांती झाल्याशिवाय समाजाला न्याय मिळणार नाही त्यासाठी समाजाने आरक्षणाच्या लढयासाठी सज्ज रहावे असे आवाहन गोपीचंद पडळकर यांनी केले.

हुन्नुर येथे धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत समाजबांधवाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते यावेळी व्यासपिठावर उत्तमराव जानकर सभापती प्रदीप खांडेकर, दामाजी संचालक लक्ष्मण नरुटे, विजय माने, नगरसेवक अनिल बोदाडे, रासपचे धनाजी गडदे, बापू मेटकरी, रविकिरण कोळेकर, विष्णू माने, शंकर काळे, नामदेव जानकर, जगन्नाथ रेवे, अंकुश खताळ, दादा गरंडे, गुलाब थोरबोल, अमोल माने, धनाजी बिचुकले, आदीसह धनगर समाजातील सरपंच व तालुक्यातील समाजबांधव मोठया संख्येने उपस्थित होते 

यावेळी बोलताना पडळकर म्हणाले, आरक्षणावरुन समाजाने उठाव केला म्हणून 60 वर्षे धनगर समाजास झुलवलेल्या  सरकारला गाढून टाकले. हे सरकार देखील आरक्षण देण्यास टाळाटाळ करत आहे. त्यासाठी प्रस्थापिताच्या विरोधात आता लढावे लागणार आहे. कारण प्रस्थापितांना जात नसते त्यांना सत्ता हवी असते. सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता. विदयमान सरकारने फक्त शिफारस केल्याचे सांगून वेळ मारुन नेत आहे. आरेवाडीच्या मेळाव्यातून सरकारने बोध घ्यायवा हवा आहे. आम्ही बिरोबाची शपथ घेतली आहे. जोपर्यत मंगळवेढयाच्या प्रांत कार्यालयातून या समाजातील पोरांचा एसटीच्या जातीचा दाखला मिळत नाही तो पर्यत आरक्षणाची लढाई थांबवली जाणार नाही. शिवाय कमळ व धनुष्य बाण या चिन्हावर मतदानही करणार नाही. राज्यातीलच काय केंद्रातील सरकार पाडायची ताकद महाराष्ट्रातील धनगरात आहे. सध्या समाजातील तरुणांनी जागे रहाण्याची गरज आहे. येणारे माहिने महत्वाचे आहेत कारण यातच पुढच्या पिढीचे भवितव्य दडले आहे. 

यावेळी बोलताना उत्तमराव जानकर म्हणाले, आरक्षण न मिळाल्याने आजही अशिक्षित समाज गावकुसाबाहेर राहत आहे. राजकीय ज्ञानाचा अभाव असल्याने सर्व पक्षांनी या समाजाचा वापर करुन घेतला. यापुर्वीच्या सरकारने न्याय दिला नाही. म्हणून त्याला गाढले आता भाजपा सरकारचाही आरक्षण न दिल्यास सुफडा साफ करायचा आहे. समाज सत्तेत मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या शिवाय धनगर समाजाची उन्नती होणार नाही. यासाठी धनगर समाजाने आपसातील हेवेदावे विसरून एकत्र येणे ही काळाची गरज आहे. 

यावेळी बापू मेटकरी, डॉ दोलतडे आदींनीही मनोगत व्यक्त केले. या मेळाव्यास तालुक्यातील सर्व गावातील धनगर समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थीत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com