धनगर समाज चंद्रभागा तिरावर मुंडन करून श्राद्ध घालणार

अभय जोशी
बुधवार, 18 जुलै 2018

पंढरपूर ः आषाढी एकादशी दिवशी शासकीय महापूजे दरम्यान शासनाच्या नावाने चंद्रभागा तिरावर मुंडन करून श्राद्ध घालणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य धनगर आरक्षण कृती समितीच्या वतीने आज (बुधवार) येथे पत्रकार परिषदेत देण्यात आली. मराठा क्रांती मोर्चा, कोळी समाज तसेच विविध शेतकरी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांना पूजा करु न देण्याचा इशारा दिला आहे. या आंदोलनात धनगर समाज देखील सहभागी होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

येथील शासकीय विश्रामगृहात धनगर आरक्षण कृती समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. परमेश्‍वर कोळेकर, प्रा.शिवाजीराव बंडगर, जयंत बगाडे, पांडुरंग मिरगळ, माउली हळणवर, मारूतीराव पाटील, विठ्ठल पाटील, तानाजी वाघमोडे, शालिवाहन कोळेकर, रायप्पा हळणवर, आदित्य फत्तेपूरकर आदींसह धनगर समाजातील पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

धनगर समाजाच्या भूमिके विषयी बोलताना पांडुरंग मिरगळ यांनी, सत्ता येण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाला आरक्षण देण्याची घोषणा केली होती. परंतु चार वर्षे झाली तरी अजून या सरकारने आरक्षणाचा निर्णय घेतला नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. या प्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल असून यावर सरकारने आपले नकारात्मक म्हणणे मांडले आहे. यामुळे भाजपा विरोधात समाजात कॉंग्रेस व राष्ट्रवादी सरकारपेक्षा तीव्र नाराजी निर्माण झाली असल्याची भावना व्यक्‍त केली. आता आरक्षणासाठी अंतिम लढाई सुरू असून याची सुरूवात पंढरपूर मधील आंदोलना पासून केली जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी प्रा.शिवाजी बंडगर म्हणाले, धनगड हा शब्दच अस्तित्वात नसल्याचे सांगून स्वातंत्र्यानंतर देशातील एकाही धनगड जातीच्या व्यक्तीला शासकीय मदत मिळाली नसल्याचे स्पष्ट केले. उत्तर प्रदेश, बिहार येथे धनगरांना आरक्षण मिळते तर महाराष्ट्रात का मिळू शकत नाही असा प्रश्‍न प्रा.बंडगर यांनी उपस्थित केला.

आषाढी एकादशी दिवशी मराठा क्रांती मोर्चा, कोळी समाज, बळीराजा शेतकरी संघटना, स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनात धनगर समाज बांधव देखील सहभागी होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

Web Title: dhangar community will remove hair in protest of reservation at pandharpur