धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी सोमवारी मंगळवेढामध्ये मोर्चा

हुकूम मुलाणी
रविवार, 12 ऑगस्ट 2018

सत्ता द्या सहा महिन्यात धनगर समाजाला आरक्षण देतो असे आश्वासन सरकारने दिले होते. असे चार वर्षे झाली तरीही आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागला नाही. यावेळी महाराष्ट्र राज्यातील तमाम धनगर समाजास अनुसुचीत जमातीचे दाखले देऊन सवलतीची अंमलबजावणी त्वरीत करावी. 

मंगळवेढा : मुख्यमंञ्याच्या खोट्या अश्वासनाबद्दल धनगर समाजातून तिव्र नाराजी पसरली असून, समाजाच्या सर्वपक्षीय नेत्यांमध्ये बैठक होऊन सर्वांनी एकसंघपणे लढा देण्याचा निर्णय घेतला. या लढ्याचा इतरांना त्रास होणार नाही याची खबरदारी घेत उद्या   प्रांत कार्यालय ते तहसील कार्यालयापर्यंत भव्य अशा स्वरूपाचा मोर्चा काढुन तहसील कार्यालयासमोर समोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. 

या बैठकीसाठी तालुक्यातील धनगर समाजाचे सर्व नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. सोशल मिडीयात 13 ऑगस्टला मंगळवेढा बंद राहील अशा स्वरूपाचे मेसेज व्हायरल केले. परंतू गोरगरीब शेतकरी, व्यापारी व इतर समाजाच्या भावना लक्षात घेता हे आंदोलन शांततामय मार्गाने केले जाणार असुन मंगळवेढा बंद राहणार नाही हेही यावेळी स्पष्ट केले.

सत्ता द्या सहा महिन्यात धनगर समाजाला आरक्षण देतो असे आश्वासन सरकारने दिले होते. असे चार वर्षे झाली तरीही आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागला नाही. यावेळी महाराष्ट्र राज्यातील तमाम धनगर समाजास अनुसुचीत जमातीचे दाखले देऊन सवलतीची अंमलबजावणी त्वरीत करावी. सोलापूर विद्यापीठाला राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव त्वरीत देण्यात यावे. महाराष्ट्र राज्यात धनगर आरक्षणासाठी झालेल्या अांदोलना संदर्भात दाखल करण्यात आलेले आजपर्यंतचे सर्व गुन्हे मागे घेण्यात यावेत. 
समांतर आरक्षणाचे शासनाने काढलेले दि. १३ /०८ / २०१४  च्या परिपञकात योग्य त्या सुधारणा कराव्यात व समाजावर झालेला अन्याय दुर करावा.या मागण्या आहेत.

Web Title: Dhangar reservation demand Bandh in Mangalwedha