लोकसहभागातून आकारली सार्वजनिक विहीर

सुनील शेडगे
बुधवार, 20 जून 2018

नागठाणे - ध्येयाचा ध्यास अन्‌ प्रबळ इच्छाशक्ती असेल तर एखादा ज्वलंत प्रश्न मार्गी लागू शकतो. धनवडेवाडी या छोट्याशा गावाने लोकसहभागातून पाण्याची विहीर बांधून त्याचीच प्रचिती दिली.

धनवडेवाडी हे सातारा तालुक्‍याच्या पश्‍चिम भागातले गाव. डोंगराच्या अगदी कुशीत वसलेले. लोकसंख्या जेमतेम पाचशेच्या घरात. गावाला आध्यात्मिक वारसा लाभला आहे. संत गाडगेबाबांनीही या गावाला भेट दिली होती.

अलीकडच्या काळात गावाला पाणी टंचाईची समस्या भेडसावू लागली. विशेषतः उन्हाळ्यात पाण्याचा प्रश्न चिंतेचा विषय बनू लागला. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी स्वतः पुढाकार घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याचे ठरविले. त्यासाठी मुंबईकर मंडळाचे मोलाचे सहकार्य लाभले. या सर्वांच्या एकजुटीतून तब्बल नऊ लाखांचा निधी जमा झाला. त्यातून अवघ्या ४० दिवसांत ४७ फूट खोल व ४० फूट रुंद अशी विहीर आकारास आली. नुकताच तिचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात झाला. या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमास संपूर्ण गावाची तसेच मुंबईकरांची उपस्थिती होती. सर्वांच्याच चेहऱ्यावर स्वप्नपूर्तीचा आनंद ओसंडून वाहत होता.

श्रमलेल्या हातांना मान
लोकार्पण कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही मान्यवरांऐवजी ज्यांनी विहिरीसाठी श्रम केले, त्यांनाच उद्‌घाटनासाठी प्राधान्य देण्यात आले. या सर्वांचा ग्रामस्थांच्या वतीने पोशाख देऊन सत्कार करण्यात आला.

Web Title: dhanwadewadi well People participation