धारवाड- हबीबगंज एक्‍सप्रेस घेणार निरोप 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 मे 2019

मिरज - धारवाड - हबीबगंज (भोपाळ) साप्ताहिक एक्‍सप्रेस 29 जूनपासून निरोप घेणार आहे. प्रतिसाद नसल्याने गाडी तोट्यात आहे, असे रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे दीड वर्षांपासून ती धावते आहे. 

मिरज - धारवाड - हबीबगंज (भोपाळ) साप्ताहिक एक्‍सप्रेस 29 जूनपासून निरोप घेणार आहे. प्रतिसाद नसल्याने गाडी तोट्यात आहे, असे रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे दीड वर्षांपासून ती धावते आहे. 

धारवाडहून निघणारी ही गाडी दर रविवारी पहाटे पाच वाजता  मिरजेत येते. दहाच्या सुमारास पुण्यात पोहोचते. परतीत शनिवारी दुपारी तीन वाजता मिरजेत येण्याची नियोजित वेळ आहे. प्रत्यक्षात चार-पाच तास विलंबाने म्हणजे रात्री आठ-नऊ वाजता येते. मिरज - सांगली - पुणे दरम्यानच्या प्रवासांसाठी ती उपयुक्त होती. नेहमीच्या गाड्यांना हाऊसफुल्ल गर्दी पाहता तिला आरक्षणाची हमी असे. सांगली - मिरजेतील प्रवाशांना आधार होता.

गाडीला कऱ्हाड व सातारा येथे थांबे आहेत. लांब पल्ल्यासाठी गाडीला पुरेसे आरक्षण मिळत नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे ती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 29 जूनरोजी तिची अखेरची फेरी होईल. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dharwad - Habibganj Express up to 29 June