माळशिरसमध्ये भाजपला धक्का; धवलसिंह मोहिते पाटलांचा राष्ट्रवादीला पाठिंबा 

NCP
NCP

पंढरपूर : माळशिरस विधानसभा मतदारसंघात आता भाजपने उपरा उमेदवार दिल्याने जनसेवा संघटनेचे नेते धवलसिंह प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. 

लोकसभा निवडणुकीत माळशिरस मधील सर्वच विरोधक एकत्र आल्यानंतर एक लाखांपेक्षा अधिक मताधिक्य भाजप उमेदवारास मिळाले. पण आता विधानसभा निवडणुकीत भाजपने स्थानिक उमेदवार न देता दुसऱ्या जिल्हयातील उमेदवार दिला. माळशिरस विधानसभा मतदारसंघातील स्थानिक नेतृत्वाने तो का स्विकारला हे मात्र गुलदस्त्यातच आहे. अनेक  सक्षम स्थानिक उमेदवार असताना आम्ही बाहेरच्यांना का मतदान करायचे अशी भावना माळशिरस मतदारसंघात आहे.

याविषयी बोलताना धवलसिंह मोहिते पाटील म्हणाले, की अशा सर्व गोष्टींना कंटाळून आपण राष्ट्रवादीला मदत करण्याची भूमिका घेतली आहे. यामुळे आता माळशिरसमध्ये भाजप विरूद्ध राष्ट्रवादी अशी लढत होण्याऐवजी मोहिते पाटील विरूध्द मोहिते पाटील असा सामना होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com