संत गाडगेबाबा ग्रामस्वछता अभियानांतर्गत ढोक बाभुळगावला प्रथम पुरस्कार

राजकुमार शहा 
शुक्रवार, 22 जून 2018

मोहोळ (सोलापूर) : संत गाडगेबाबा ग्रामस्वछता अभियानांतर्गत ढोक बाभुळगाव (ता. मोहोळ) येथील ग्रामपंचायतीला प्रथम, द्वितीय पुरस्कार पाटकुल तर तृतीय पुरस्कार वडवळ ग्रामपंचायतीला मिळाले आहेत. पुरस्कार वितरण जि.प.चे अध्यक्ष संजय मामा शिन्दे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. रोख रक्कम प्रशस्तीपत्रक व सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. 

शासनाच्या नियमानुसार गाव शंभर टक्के हागणदारी मुक्त ग्रामस्वछता वृक्षारोपण अंगणवाडी जिल्हा परिषद शाळा या ठिकाणी शौचालय तसेच वृक्षारोपण केलेल्या झाडांना ठिबक सिंचन जिप शाळा व ग्रामपंचायत आयएसओ सांडपाणी व्यवस्थापण आदी योजना प्रभावीपणे राबविल्या. यासाठी गटविकास अधिकारी अजिंक्य येळे विस्तार अधिकारी संदीप खरबस उपसरपंच गावातील सर्व ग्रामस्थ ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक एस एस लादे यांनी मार्गदर्शन व सहकार्य केल्यामुळेच गावाला पुरस्कार मिळाल्याचे सरपंच शिवाजी पासले यांनी सांगितले. दरम्यान तालुका व जिल्हा स्तरीय पथकाने पाहणी करून अहवाल शासनाला सादर केला होता.

सोलापुर येथील हुतात्मा स्मृती मंदिरात विभागीय विकास आयुक्त चंद्रकांत गुडेवार मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिन्दे अर्थ व बांधकाम सभापती विजयराज डोंगरे मोहोळ पंचायत समितीच्या उपसभापती साधना देशमुख यांच्या उपस्थितीत सरपंच शिवाजी पासले ग्रामसेवक एस. एस. लादे यांनी पुरस्कार स्विकारला.

Web Title: dhok babhulgao awarded for sat gadgebaba gramswacchta abhiyan