नेवाशात धनगर समाजाचे 'ढोल बजाओ' आंदोलन

Dhol Bajo agitation of Dhangar community in Nevasa
Dhol Bajo agitation of Dhangar community in Nevasa

नेवासे : धनगर समाजाला अनुसूचीत जमातीचे आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी सकल धनगर समाज आरक्षण कृती समितीच्या वतीने सोमवार (ता. 20) रोजी मोर्चा काढून नेवासे तहसील कार्यालयासमोर 'ढोल बजाओ' आंदोलन करण्यात आले.

दरम्यान डफ, ढोल, ताशांचा दणदनाट व भांडाऱ्याची उधळण, पिवळे फेटे व हातात पिवळे झेंडे घेवून सहभागी झालेल्या हजारो तरुण-तरुणी व महिलांसह आंदोलकांच्या 'येळकोट.. येळकोट.. जय मल्हार..! च्या गगनभेदी जयघोषांनी नेवासे नगरी दणाणली आहे. सर्वत्र पिवळाच रंग नजरेत पडत असल्याने नेवासे शहराला प्रति जेजुरीचे आले होते.

राज्य धनगर समाज कृती समितीचे उत्तमराव जानकर, गोपीचंद पडवळकर यांच्या नेतृत्वाखाली नेवासे बाजार समिती ते नेवासे तहसील कार्येलाय अशा मोर्चाने 'ढोल बजाओ' आंदोलनास प्रारंभ झाला. मोर्चाच्या अग्रभागी मेंढ्यांचे कळप होता. माजी आमदार शंकरराव गडाख वगळता तालुक्यातील इतर नेत्यांनी आंदोलनाकडे पाठ फिरविली. गडाख प्रारंभी पासून आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी तहसील कार्येलायासमोर झालेल्या सभेत प्रारंभी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयीव श्रद्धांजली वाहण्यात आली.

गोपीचंद पडळकर म्हणाले, 'आदिवाशी समाजाचे व धनगर समाजाचे हे भांडण नाही. आदिवाशी नेत्यांचा आम्हाला असलेला विरोध हा राजकीय हेतूने प्रेरित आहे. आमचा लढा धनगड विरुद्ध धनगर असा आहे. राज्यातील 2 कोटी धनगर समाज हीच आपली ताकत असून याच ताकतीवर आम्ही आरक्षण मिळवून दाखवू.

शंकरराव गडाख म्हणाले, 'इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता धनगर, मराठा व मुस्लिम समाजाला आरक्षण देने गरजेचे आहे. आरक्षणासाठी समाज आंदोलन करत असतांना हे सरकार फक्त बघ्याची भूमिका घेत आहे. सरकारने शब्द देऊन चार वर्षात हा प्रश्न सुटला नाही हेच सरकारचे अपयश आहे. यावेळी अशोक कोळेकर, प्रतीक्षा भगत यांची भाषणे झाली.

तहसीलदार उमेश पाटील यांना प्रतीक्षा भगत, प्रेमराज खंडागळे यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले. दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. शरद गोर्डे, संगीता राउत, कैलाश देशमाने यांच्या नेतृत्वाखाली नेवासे फाटा, नेवासे शहरात 142 पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 

...तर 'नोटा' बटन दाबणार

धनगर समाजाला आरक्षण न मिळाल्यास आगामी सर्वच निवडणुकांत कोणत्याही राजकीय पक्षाच्या उमेदवारांना मतदान न करता सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी सकल धनगर समाज 'नोटा'चे बटन दाबणार असल्याचे अनेक आंदोलकांनी आंदोलन दरम्यान पत्रकारांशी बोलतांना आपल्या भावना व्यक्त केल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com