इंदिरा गांधी स्टेडीअमवर घुमतोय ढोल-ताशांचा दणदणाट 

Dhol Tasha Competition on Indira Gandhi stadium
Dhol Tasha Competition on Indira Gandhi stadium

सोलापूर : डीजेमुक्त उत्सव साजरा करण्यासाठी पोलिस आयुक्तालयाने मंडळांना प्रोत्साहन दिले आहे. याच अंतर्गत ढोल-ताशा आणि लेझीम स्पर्धेला शनिवारपासून सुरुवात झाली. इंदिरा गांधी पार्क स्टेडियम परिसर ढोल-ताशाच्या आवाजाने दणाणून गेला होता. 

महापौर शोभा बनशेट्टी, महापालिका आयुक्त अविनाश ढाकणे, पोलिस आयुक्त महादेव तांबडे यांच्या प्रमुख उपस्थित स्पर्धेचे उद्‌घाटन झाले. याप्रसंगी मंचावर पोलिस उपायुक्त शशिकांत महावरकर, एम. बी. गायकवाड, सहायक पोलिस आयुक्त अभय डोंगरे, रूपाली दरेकर, दिपाली काळे, रमेश चोपडे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सूर्यकांत पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न घेतले आहेत. 

स्पर्धेच्या उद्‌घाटन कार्यक्रमानंतर शिवताल ढोल ताशा पथक, शिवस्वराज्य ढोल ताशा पथक, निलकंठेश्वर ढोल ताशा पथक, अथर्व ढोल ताशा पथकाने आपली कला सादर केली. ही आगळीवेगळी स्पर्धा पाहण्यासाठी सोलापूरकरांनी गर्दी केली होती. 8 ऑक्‍टोबरपर्यंत सायंकाळी चार ते रात्री दहा या वेळेत ही स्पर्धा होणार असून सोलापूरकरांनी कुटूंबासह या स्पर्धेचा आनंद घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com