धोम धरणातून ५६६८ कुसेक्स पाणी सोडले नदीपात्रात

भद्रेश भाटे
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

नदीतील पाण्यात पोहण्याचा आनंद काही तरुणांनी घेतला. दुपारी एकच्या सुमारास धरणातील पाणी पातळी ७४७ मीटर व पाणी साठा १३.०४ टीएमसी झाला.

वाई - तालुक्याच्या पश्चिम भागात संतधार तसेच अधून मधून जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे धोम धरण पूर्ण क्षमतेने भरले असून आज धरणातून ५६६८ कुसेक्स पाणी नदी पात्रात सोडण्यात आल्याने कृष्णा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. नदीतीरावरील प्रसिद्ध महागणपती मंदिराच्या सभा मंडपात पाणी शिरले आहे.

दरम्यान नदीतील पाण्यात पोहोण्याचा आनंद काही तरुणांनी घेतला. दुपारी एकच्या सुमारास धरणातील पाणी पातळी ७४७ मीटर व पाणीसाठा १३.०४ टीएमसी झाला. धरण ९६.६२ टक्के भरले असून पश्चिम भागातील पावसाचा जोर विचारत घेऊन धरणाच्या सांडव्या वरून ४९७४ व वीजगृह मधून ४९४ कुसेक्स पाणी नदी पात्रात सोडण्यात येत आहे. 
 

Web Title: From the Dhom dam 5668 cuscus water leaves in the river