धोम धरणाची शेतकऱ्यांकडून परिक्रमा 

धोम धरणाची शेतकऱ्यांकडून परिक्रमा 

सातारा - धोम धरणाच्या लाभक्षेत्रातील कोरेगावसह सातारा, वाई, जावळी तालुक्‍यांतील शेतकऱ्यांनी नुकतीच धोम धरणाची परिक्रम पूर्ण करून धरणातील पाणी डोळे भरून पाहून अखेर धरणामध्ये श्रीफळ सोडून जलपूजन केले. धरण पाण्याने काठोकाठ भरल्याने सर्वांनी वरुणराजाला भरभरून धन्यवादही दिले. 

कोरेगाव, सातारा, वाई, जावळी या तालुक्‍यांतील शेतकऱ्यांच्या बागायतीसह कोरडवाहू पिकांना धोम धरणाचे पाणी हा मोठा आधार आहे. या पाण्यावर या तालुक्‍यांतील शेतकऱ्यांच्या पिकांचे उत्पादन अवलंबून असते. त्यामुळे या चार तालुक्‍यांतील शेतकऱ्यांचे पावसाळी हंगामामध्ये धोम धरण 

परिसरात होणारा पाऊस आणि धरण भरण्याच्या पाणीपातळीवर सातत्याने लक्ष असते. प्रसंगी हा शेतकरी लाभक्षेत्रात पाऊस कमी-जास्त झाला तरी चिंतेत राहत नाही. मात्र, धोम धरण परिसरात पडणाऱ्या पावसावर त्यांचे समाधान अवलंबून असते. धरण परिसरात चांगला पाऊस झाला आणि धरण भरले की, हा शेतकरी आनंदित होताना दिसतो. कारण धरण भरले की, त्यांचा वर्षभराचा शेतीच्या पाण्याचा प्रश्‍न सुटल्यात जमा होतो. मग, प्रसंगी पाणीटंचाई वाढली आणि धोम धरणाचे एखादे आवर्तन कमी आले तरी चालू शकते. या पार्श्‍वभूमीवर धोम धरण पाणी बचाव संघर्ष समितीच्या पुढाकाराने गेल्या काही वर्षांपासून धोम धरण भरले की, चार तालुक्‍यांतील शेतकरी एकत्र येऊन धोम धरण परिक्रमा आयोजित करतात. परिक्रमेत सहभागी होणारी शेतकरी संख्या लक्षात घेऊन काही शेतकरी आपापली चारचाकी वाहने स्वखर्चाने काढतात. प्रत्येक शेतकरी आपला भोजनाचा डबा घेऊन परिक्रमेत सहभागी होतो. संपूर्ण धरणाची परिक्रमा वाहनांद्वारे पूर्ण करून धरणातील पाणी शेतकरी डोळे भरून पाहतात. शेवटी धरणाच्या भिंतीजवळ येऊन जलपूजन करतात. तेथे डबाभोजन करतात आणि परिक्रमेची सांगता केली जाते. त्यानुसार यंदा झालेल्या परिक्रमेलाही चांगला प्रतिसाद मिळाला. 

परिक्रमेत धोम धरण पाणी बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष सी. आर. बर्गे, कार्याध्यक्ष रणजित फाळके, सचिव तात्यासाहेब डेरे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अविनाश फाळके, माणिकराव भोसले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे हणमंतराव जगदाळे, माजी सैनिक संघटनेचे कॅप्टन महादेव भोसले, अर्जुन भोसले, समितीचे सदस्य, शिवथर, भक्तवडी, सातारारोड, कोरेगाव, कुमठे, शिरंबे, एकसळ, रहिमतपूर आदी भागातील शेतकरी सहभागी झाले होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com