सुंदर रंकाळ्याच्या मागणीसाठी धोंडिराम चोपडे यांची प्रदक्षिणा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 जानेवारी 2017

कोल्हापूर - स्वच्छ व सुंदर रंकाळ्याच्या मागणीसाठी व प्रसन्न आरोग्यासाठी चाला, हा संदेश
नववर्षाच्या सुरवातीला देण्याकरिता रंकाळाप्रेमी धोंडिराम चोपडे यांनी आज सकाळी रंकाळ्याभोवती पाच प्रदक्षिणा घातल्या. आज पहाटे रंकाळा टॉवर येथून प्रदक्षिणेस सुरवात झाली. पावणेआठ वाजेपर्यंत सलग चालत २२.५ किलोमीटरचे अंतर कापत त्यांनी पाच प्रदक्षिणा पूर्ण केल्या. यामध्ये त्यांना डॉ. अमर अडके, एम. पी. शिंदे, अजित मोरे, नाना गवळी, डॉ. विश्‍वनाथ भोसले, प्रकाश कुंभार, पद्माकर अडके, इंद्रजित बोंद्रे, बाळासाहेब रसाळ यांनी साथ दिली.

प्रदक्षिणा पूर्ण होताच रंकाळा मॉर्निंग वॉकर्सनी जल्लोष केला. यानंतर रंकाळा संवर्धन व संरक्षण समितीच्या वतीने त्यांचा कोल्हापुरी फेटा, शाल, पुष्पगुच्छ देऊन चित्रपट दिग्दर्शक यशवंत भालकर, सुभाष हराळे यांच्या हस्ते सपत्नीक सत्कार झाला. या वेळी ॲड. अजित चव्हाण, अशोक देसाई, विकास जाधव, आनंदराव चिखलीकर उपस्थित होते. श्री. चोपडे गेल्या ३० वर्षांपासून रंकाळ्यावर फिरावयास येतात. सध्या त्यांचे वय ५९ वर्षे आहे. रंकाळ्यावर वृक्षलागवड, संवर्धन यासह विविध उपक्रमांत त्यांचा सहभाग असतो.

Web Title: Dhondiram Chopade revolutions for beautiful Rankala