रुग्णांच्या अडचणी दूर करा : रुग्णकल्याण समितीने सुनावले खडे बोल...!

तुषार देवरे
गुरुवार, 31 ऑगस्ट 2017

सरपंच शंकरराव खलाणे यांनी तात्काळ कुटुंब नियोजन शस्रक्रिया विभाग तात्काळ सुरू करा, तपासणी शिबिरासाठी रूग्ण कल्याण समितीला बोलवा.

देऊर : 'आरोग्य सेवा ही ईश्वर सेवा' मानली जाते. ती शेतकऱ्यांना, गरिबांना चांगली द्या. रूग्णांच्या अडचणी दूर करा. परिसर स्वच्छ ठेवा; कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया विभाग तात्काळ सुरू करा, तपासणी शिबिरासाठी रूग्ण कल्याण समितीला बोलवा. असे विविध प्रश्न उपस्थित करत, कामकाजाबद्दल कडक शब्दांत सूचना देऊन, विविध माहितीचा आढावा घेतला. त्यावेळी या समितीने नाराजीचा सूर व्यक्त केला.

आज रूग्ण कल्याण समितीने राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत रूग्ण कल्याण नियामक मंडळ समितीची बैठकीत दिल्या. नेर (ता.धुळे) येथे आज प्राथमिक आरोग्य केंद्रात रूग्ण कल्याण समितीची  ही पहिली बैठक झाली. जिल्हा परिषद सदस्य तथा समिती अध्यक्ष डाॅ. तुळशीराम गावित, पंचायत समिती उपसभापती दिनेश भदाणे, नेर सरपंच शंकरराव खलाणे उपस्थित होते. उपसभापती दिनेश भदाणे यांनी प्रत्यक्ष कामकाजाच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी केलेल्या नोंदीची रजिस्टरवर तपासल्या. शेतकऱ्यांचे आरोग्य चांगले असावे,या ध्येयाने त्यांच्यावर उपचार करा. गरिबांना सुविधा मिळत नसतील तर काय उपयोग? असा प्रश्न यावेळी त्यांनी केला. सरपंच शंकरराव खलाणे यांनी तात्काळ कुटुंब नियोजन शस्रक्रिया विभाग तात्काळ सुरू करा, तपासणी शिबिरासाठी रूग्ण कल्याण समितीला बोलवा. वीज मीटर संदर्भात अभियंत्याना फोन करून जोडणी करण्याचे सांगितले. परिसरातील भौतिक सुविधा काय अपूर्ण आहे. ते सांगा. वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करून समस्या दूर केली जाईल. मात्र कामात सुधारणा हवी. असे खडे बोल त्यांनी यावेळी सुनावले. दोन एम.बी.बी.एस. डाॅक्टर आहेत. ग्रामस्थांना त्याचा लाभ झाला पाहिजे.

अध्यक्ष डाॅ गावित म्हणाले की, रूग्ण येण्याच्या अगोदर केंद्रात स्वच्छता झाली पाहिजे. प्रत्येक कर्मचाऱ्याने जबाबदारीने वागा. येत्या रविवारी रूग्ण कल्याण समिती सह आरोग्य कर्मचाऱ्यांनी 'स्वच्छता अभियान' राबविण्यासाठी साहित्यासह उपस्थित राहावे. सर्व कर्मचाऱ्यांनी बैठकिस उपस्थित राहावे. शिस्तबद्धीने काम करा. यावेळी औषधी भांडारासाठी लागणाऱ्या औषधी खरेदीस अनुदान मंजूरी दिली. वाहन चालकाच्या रोजंदारीस मंजूरी, जैविक घन कचरा व्यवस्थापन खर्चास मंजूरी, प्रयोगशाळा साठी विविध साहित्य खरेदी करणे. आरोग्य केंद्रातर्गत विविध सुविधांसाठी नियोजित आर्थिक मंजूरी घेण्यात आली. ही बैठक वर्षातून दोनदा होत असते. यात एक लाख रूपये खर्चासाठी येत असतात. वैद्यकिय अधिकारी डाॅ.जे.एम.बोरसे यांनी केंद्राच्या विविध समस्यां समिती समोर मांडल्या. रेबीज च्या 230, सर्पदंश च्या 20 लसी अद्याप उपलब्ध असल्याचे सांगितले. व वरिष्ठ स्तरावर करावयाच्या कामासंदर्भात मागणी अहवाल पाठविला असल्याचे त्यांनी सांगितले. डाॅ. हितेंद्र पाटील, आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. रूग्ण कल्याण समितीतील बहुतांश सदस्यांनी पाठ फिरविल्याचे दिसले. आरोग्य विभागाच्या दृष्टीने ही महत्वपूर्ण बैठक असते. मात्र बैठकीबाबत गांभीर्य नसल्याचे पुन्हा समोर आले आहे. 

Web Title: dhule marathi news resolve patients health issues