नाथपंथी डवरी समाजाच्या नागरिकांवर हल्ला करणाऱ्यांवर कारवाईची मागणी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जुलै 2018

राईनपाडा (ता. साक्री) येथे नाथपंथी डवरी समाजाचे कांही नागरिक भिक्षा मागण्यासाठी आठवडा बाजारात गेले होते. मात्र मुले पळवणारी टोळी समजुन समाजकंटकांनी त्यांना ग्रामपंचायत कार्यालयात कोंडुन ठेचुन मारले. या सर्व संशयितांवर खुनाचा गुन्हा दाखल करावा, तसेच मृतांच्या कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी शासनाने स्विकारावी अन्यथा प्रतिष्ठानच्या वतीने अांदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

मोहोळ : नाथपंथी डवरी समाजाच्या नागरिकांवर हल्ला करणाऱ्यांना कडक शासन करावे तसेच त्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पंचवीस लाखाची मदत द्यावी. या सह अन्य मागण्यांचे निवेदन मोहोळचे तहसीलदार किशोर बडवे यांना भिम युवा प्रतिष्ठान मोहोळ यांच्या वतीने देण्यात आले. 

राईनपाडा (ता. साक्री) येथे नाथपंथी डवरी समाजाचे कांही नागरिक भिक्षा मागण्यासाठी आठवडा बाजारात गेले होते. मात्र मुले पळवणारी टोळी समजुन समाजकंटकांनी त्यांना ग्रामपंचायत कार्यालयात कोंडुन ठेचुन मारले. या सर्व संशयितांवर खुनाचा गुन्हा दाखल करावा, तसेच मृतांच्या कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी शासनाने स्विकारावी अन्यथा प्रतिष्ठानच्या वतीने अांदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

निवेदनावर अध्यक्ष विनोद कांबळे, गणेश गुरव, नितीन क्षिरसागर, दादा कापुरे, गणेश शिरसट, राहुल कसबे, अभिमान पाटुळे, जालींदर मोरे, प्रकाश उबर दंड आदी उपस्थित होते.

Web Title: dhule mass murder case mohol