पंतप्रधानांच्या संकल्पनेतील "डिजिटल पेमेंट' प्रत्यक्षात 

विजयकुमार सोनवणे
गुरुवार, 26 जुलै 2018

सोलापूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील "डिजिटल पेमेंट'ची प्रत्यक्षातील कार्यवाही सोलापुरात सुरू झाली आहे. महापालिकेसह केंद्र आणि राज्य शासनाच्या कार्यालयांतही ही प्रक्रिया सुरू करण्यासंदर्भात आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांच्या उपस्थितीत  आढावा बैठक झाली. 

सोलापूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील "डिजिटल पेमेंट'ची प्रत्यक्षातील कार्यवाही सोलापुरात सुरू झाली आहे. महापालिकेसह केंद्र आणि राज्य शासनाच्या कार्यालयांतही ही प्रक्रिया सुरू करण्यासंदर्भात आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांच्या उपस्थितीत  आढावा बैठक झाली. 

स्मार्ट सिटी योजनेंतर्गत प्रत्येक शासकीय कार्यालय डिजिटल झाले पाहिजे, अशा सक्त सूचना पंतप्रधान कार्यालयाने दिल्या आहेत. त्यासाठी 1 जुलै ते 31 ऑक्‍टोबर २०१८ हा कालावधी निश्‍चित करण्यात आला आहे. त्यादृष्टीने महापालिकेने पहिले पाऊल टाकले आहे.  स्मार्ट सिटी कार्यालयातील व्यवहार 100 टक्के डिजिटल करण्यात आले आहेत. दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी होते की नाही, याचा दर महिन्याचा अहवाल पंतप्रधान कार्यालयाला पाठवावा लागणार आहे. त्यामुळे प्रत्येक कार्यालयाने डिटिलायझेशनसाठी तयारी सुरू केली आहे. 

डॉ. ढाकणे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीस मुख्य लेखापरीक्षक तथा प्रभारी उपायुक्त अजयसिंह पवार, मुख्य लेखापाल शिरीष धनवे यांच्यासह बीएसएनएल, रेल्वे, इंडिन ऑइल, पोस्ट खात्याचे अधिकारी उपस्थित होते. या खात्यातील व्यवहार कशा पद्धतीने डिटिलायझेन करायचा, याच्या सूचना डॉ. ढाकणे यांनी दिल्या. या महत्त्वाच्या खात्याबरोबरच राज्य शासनाची कार्यालयेही याच पद्धतीने डिजिटल पेमेंटच्या धर्तीवर विकसित करायची आहेत. त्यादृष्टीनेही प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. 

पहिल्या टप्प्यात शासकीय कार्यालये आणि दुसऱ्या टप्प्यात व्यापाऱ्यांच्या प्रतिनिधींची बैठक घेण्यात येणार आहे. शासकीय कार्यालयांसह खासगी क्षेत्रातही डिजिटल पेमेंटची संकल्पना रुजली पाहिजे यासाठी नियोजन केले आहे. 
- शिरीष धनवे, मुख्य लेखापाल सोलापूर महापालिका

Web Title: digital payment solapur municipal