सोलापूर: महापालिकेच्या आरोग्य निरीक्षकांवर 'डिजीटल वॉच'

Digital Watch on Municipal Health Inspector in Solapur
Digital Watch on Municipal Health Inspector in Solapur

सोलापूर : मुख्य आरोग्य निरीक्षक आणि निरीक्षकांवर नजर ठेवण्यासाठी त्यांना 'डिजीटल घड्याळ' (टॅग) देण्यात येणार आहेत. त्यासाठी पहिल्या टप्प्यात 65 नगांची खरेदी करण्यात येणार असून, घनकचरा व्यवस्थापन कार्यालय हे नियंत्रण कक्ष असणार आहे. 

घनकचरा व्यवस्थापनांतर्गत ही कार्यवाही ठेवली जाणार आहे. महापालिकेत चार मुख्य आरोग्य निरीक्षक तर 51 आरोग्य निरीक्षक आहेत. त्यांच्या कामाची वेळ पहाटे सहा ते दुपारी दोन अशी आहे. प्रत्येकाला विभाग निश्‍चित करून देण्यात आले आहेत. अनेकवेळा आरोग्य निरीक्षक हे आपल्याला दिलेल्या परिसराऐवजी इतर ठिकाणी फिरत असल्याचे आढळून येत होते, तसेच कर्तव्याच्या ठिकाणी न राहता 'आयुक्तांची बैठक' या नावाखाली कार्यालयात नसल्याचे प्रकार अनेकवेळा दिसून आले. 

घनकचरा व्यवस्थापनांतर्गत शहर कचरामुक्त करण्याचे नियोजन आहे. त्यानुसार सध्या घंटागाड्यांवर 'जीपीएस' लावण्यात आले आहेत. त्यामुळे कोणती घंडागाडी कोणत्यावेळी कुठे फिरते याची माहिती पालिकेच्या कक्षात बसून पाहता येते. त्यामुळे घंटागाड्या वेळेवर नेणे, कचरा उचलणे, नियोजित वेळेत निश्‍चित केलेल्या प्रभागात घंटागाड्या न गेल्यास संबंधितांवर कारवाई असे नियोजन आहे. त्यामुळे एखाद्या भागात घंटागाडी नियोजित वेळी न गेल्याची तक्रार आली की त्याची लगेच तपासणी होते व संबंधितांना समज दिली जाते किंवा कारवाईही केली जाते. या पार्श्‍वभूमीवर आता आरोग्य निरिक्षकांवरही नजर ठेवली जाणार आहे. त्यामुळे कामाच्या वेळेत इतर ठिकाणी फिरण्याचे प्रकार आता बंद होणार आहेत. 

नोव्हेंबरपासून कार्यवाहीची शक्‍यता -
आरोग्य निरिक्षकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी 'डिजीटल घड्याळ- व्हिया टॅग' दिले जाणार आहे. ऑक्‍टोबरअखेरपर्यंत ही घड्याळे उपलब्ध होण्याचा अंदाज असून, नोव्हेंबरपासून त्याची प्रत्यक्षात कार्यवाही होण्याची शक्‍यता आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com