डिजिटल उताऱ्याचे तलाठ्यांना बक्षीस

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 मे 2018

सोलापूर : राज्यातील तलाठ्यांनी संगणकीकृत ऑनलाइन उतारे दोषमुक्‍त करून ते डिजिटल करण्यासाठी मोठे योगदान दिले आहे. त्यांचे कार्य कौतुकास्पद असून त्यांना 1 ऑगस्ट या महसूल दिनी एक वाढीव वेतनश्रेणी दिली जाईल, अशी घोषणा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोलापुरात केली. 

पाटील म्हणाले,"तलाठ्यांनी दप्तरातील लिखित उतारे व संगणकीकृत उतारे याच्यातील माहिती तंतोतंत जुळविण्यासाठी उत्तम काम केले. राज्यातील सुमारे अडीच कोटी उतारे ऑनलाइन दोषमुक्‍त झाले आहेत. त्यापैकी काही ठिकाणी डिजिटल स्वाक्षरीचे उतारे दिले जात आहेत. 1 ऑगस्टपासून राज्यभर डिजिटल स्वाक्षरीचे उतारे सर्व खातेदारांना मिळतील, असे नियोजन केले आहे. शेतकऱ्यांना सात- बारा व शेती अथवा जागेचे नकाशे हवे असतात. त्यामुळे आता नकाशे व सात- बारा उताऱ्यांसाठी शेतकऱ्यांसह अन्य खातेदारांना तालुक्‍याच्या ठिकाणी अथवा तलाठ्यांकडे हेलपाटे घालावे लागणार नाहीत.

त्यासाठी ते डिजिटल स्वाक्षरीचे घरबसल्या ऑनलाइन मिळतील. त्यात तलाठी, मंडलाधिकारी, तहसीलदार व प्रांताधिकाऱ्यांचे योगदान मोठे आहे. परंतु, सर्वप्रथम तलाठ्यांनी गावपातळीवर त्यांचे काम चोख बजावल्यानेच हे तत्काळ शक्‍य झाल्याबद्दल तलाठ्यांचे महसूलमंत्री पाटील यांनी कौतुक केले.''

Web Title: digitization in Solapur