दिग्विजय सुर्यवंशी यांना जीवे मारण्याची धमकी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 जून 2018

सांगली : राष्ट्रवादीचे नगरसेवक माजी विरोधी पक्षनेते दिग्विजय  सुर्यवंशी यांच्या घरासमोर धारदार शस्त्राने दहशत माजवून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल भाजपचे सुयोग सुतार यांच्यासह पाचजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सुर्यवंशी यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सांगली : राष्ट्रवादीचे नगरसेवक माजी विरोधी पक्षनेते दिग्विजय  सुर्यवंशी यांच्या घरासमोर धारदार शस्त्राने दहशत माजवून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल भाजपचे सुयोग सुतार यांच्यासह पाचजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सुर्यवंशी यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, राष्ट्रवादीचे नगरसेवक दिग्विजय सुर्यवंशी (वय 36, रा. प्रशांत निवास, चांदणी चौक) हे काल (शुक्रवारी) दुपारी चार वाजता घरातून बाहेर पडत असताना घरासमोर भाजपचे कार्यकर्ते  सुयोग सुतार हे राहूल बाबर याच्यासह मोटर सायकलवरुन आले. यावेळी सुतार यांच्या हातात सत्तुर होता. ते गाडीवरुन खाली उतरुन सुर्यवंशी यांच्याकडे  पहात तुला जिवंत सोडणार नाही म्हणून शिवीगाळ करु लागले. काही वेळाने ते  निघून गेले.

सुयोग सुतार पाच दहा मिनिटातच तेजस पाटील, शाहबाज रंगारी, प्रसाद महाडिक
 (सर्व रा. सांगली) यांना घेऊन पुन्हा सुर्यवंशी यांच्या घरासमोर आले आणि  शिवीगाळ करुन दहशत माजवू लागले. यावेळी गल्लीतील लोक तेथे गोळा होवू  लागले. त्यामुळे सुतारसह सर्वजण तेथून निघून गेल्याचे सुर्यवंशी यांनी  दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

चार वर्षापुर्वी सुयोग सुतार याचा साथीदार उमेश कांबळे याने दिग्विजय सुर्यवंशी यांच्यावर हल्ला केला होता. या प्रकरणी सुर्यवंशी यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. या कारणावरुन सुतार यांनी मला सत्तुर घेऊन जिवंत ठेवणार नाही अशी  धमकी दिल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. हा सर्व प्रकार दिग्विजय सुर्यवंशी यांच्या घरासमोर असलेल्या सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाला आहे.  सुयोग सुतार आणि त्यांच्या साथीदारांकडून आपल्या जीवास धोका असल्याचे 
त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

या प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी अद्याप कुणावर कारवाई केलेली नाही. 
सुयोग सुतारसह सर्व संशयितांचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Digvijay Suryavanshi threatens to kill them