सोलापूर बाजार समिती सभापतीपदी दिलीप माने, उपसभापती पदी श्रीशैल नरोळे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 जुलै 2018

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी काँग्रेसचे माजी आमदार दिलीपराव माने यांची तर उपसभापती पदी श्रीशैल नरोळे यांची निवड झाली.

सोलापूर - सहकारमंत्री सुभाषचंद्र देशमुख यांच्या मतदारसंघातील 
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी काँग्रेसचे माजी आमदार दिलीपराव माने यांची तर उपसभापती पदी श्रीशैल नरोळे यांची निवड झाली.
सहकारमंत्री देशमुख यांच्या पॅनेलचा दारुण पराभव करून माजी आमदार माने यांच्या पॅनेलने १८ पैकी १६ जागांवर यश मिळविले होते. 

यावेळी बाजार समितीचे संचालक जितेंद्र साठे, प्रकाश वानकर, राजकुमार वाघमारे, इंदुमती अलगोंडा पाटील, बाळासाहेब शेळके, प्रकाश चोरेकर, नामदेव गवळी, विजया भोसले, अमर पाटील, वसंत पाटील, अप्पासाहेब पाटील, रामप्पा चिवडशेट्टी, बसवराज इटकले, केदार उंबरजे, शिवानंद पुजारी आदी उपस्थित होते.

पालकमंत्री गैरहजर -
सहकार मंत्री देशमुख यांच्या पॅनेल विरोधातनिवडणुक लढविलेले   पालकमंत्री विजयकुमार देशमुख आज गैरहजर होते. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत पदाधिकाऱ्यांची नावे निश्चित करण्यात आली.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Dilip Mane as the Chairman of Solapur Market Committee Shrishail Narole as Deputy Chairman