दिंडी चाललीऽऽऽ विठ्ठलाच्या दर्शनाला...!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 जुलै 2016

रोज तीस किलोमीटरचा प्रवास - जिल्ह्यातील दिंड्यांचे पंढरपूरकडे प्रस्थान
कोल्हापूर - ‘निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम...‘च्या अखंड गजरात जिल्ह्यातील सर्व दिंड्यांचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले. दररोज किमान 25 ते 30 किलोमीटरचा पायी प्रवास करीत ही मंडळी आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला पंढरपुरात पोचणार आहेत. दरम्यान,
शहरातील मोठी परंपरा असलेल्या "उत्तरेश्‍वर‘सह शनिवार मंडप, कसबा बावडा येथील दिंड्यांचे प्रस्थान आज सकाळी झाले.

दरम्यान, "भाजप‘चे जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक तानाजी सावंत, दिंडीप्रमुख नाना पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्तरेश्‍वर येथील दिंडीला प्रारंभ झाला.

जिल्ह्यातील विविध ठिकाणांहून निघणाऱ्या पंढरपूर पायी वारीला तीनशेहून अधिक वर्षांची परंपरा आहे. येवती, निगवे खालसा, मरळी, चुये, कागल, पिंपळगाव, लिंगनूर, फुलेवाडी, कुंभार मंडप, स्वरूपसंचार या दिंड्यांचे गेल्या चार दिवसांपूर्वीपासून प्रस्थान झाले. आज एकाचवेळी तीन ठिकाणच्या दिंड्यांचे प्रस्थान झाल्याने कोल्हापूर- सांगली मार्ग जणू विठूनामाच्या गजराने संमोहित झाला. पहिल्या दिवशी 25, दुसऱ्या दिवशी 32, पुन्हा दोन दिवस 25, नंतर 27 आणि शेवटच्या दिवशी 32 किलोमीटरचा प्रवास करून दिंड्या पंढरपुरात पोचणार आहेत.

Web Title: Dindi darshan of God Vitthal...!