'मसाप' पारनेर शाखाध्यक्षपदी दिनेश औटी

मार्तंड बुचुडे
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

पारनेर : महाराष्ट्र साहित्य परिषद (पुणे) यांनी पारनेर शाखेला मान्यता दिल्यानंतर 'मसाप'च्या पारनेर शाखाध्यक्षपदी दिनेश औटी यांची तर प्रमुख कार्यवाह पदी पत्रकार शिवाजी शिर्के यांची यावेळी निवड जाहीर करण्यात आली. 'मसाप'चे राज्य कार्यकारीणी सदस्य जयंत येलुलकर यांच्या उपस्थितीत नवीन कार्यकारीणी जाहीर करण्यात आली.

महाराष्ट्र साहित्य परिषदेची पारनेरला शाखा व्हावी यासाठी पारनेर शहरासह तालुक्यातील साहित्यीक आणि वाचकांची अनेक वर्षांपासून मागणी होती. दिनेश औटी यांनी पारनेरला शाखा व्हावी यासाठी आग्रही भूमिका मांडली होती. यासाठी मोठ्या प्रमाणात पाठपुरावाही करण्यात आला. अखेर या प्रयत्नांना यश आले आणि पारनेर शाखेला मान्यता देण्यात येत असल्याचे पत्र मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलींद जोशी व कोषाध्यक्षा सुनिता राजे पवार यांनी दिनेश औटी यांनी सुपूर्द केले. 

येलूलकर यांच्या उपस्थितीत कार्यकारीणी जाहीर करण्यात आली. त्यानुसार अध्यक्ष दिनेश औटी, प्रमुख कार्यवाह शिवाजी शिर्के, उपाध्यक्ष दिलीपराव ठुबे, मच्छिंद्र लंके व गीताराम म्हस्के, कार्याध्यक्ष साहेबराव ठाणगे, कोषाध्यक्ष दत्ताशेठ कुलट, सह कोषाध्यक्ष संजय वाघमारे, सह कार्यवाह दत्ता झगडे. कार्यकारीणी सदस्य विलासराव भगवान पोटे, कैलासराव गाडीलकर सर, दादासाहेब पठारे, युवराज कुंडलिक पठारे. पारनेर शाखेच्या वतीने लवकरच तालुक्यातील साहित्यीकांची बैठक आयोजित केली जाणार असून विविध उपक्रम राबविले जाणार असल्याची माहिती नवनिर्वाचित अध्यक्ष औटी यांनी यावेळी सांगितली. 'मसाप'च्या पारनेर शाखेला मंजुरी दिल्याबद्दल परिषदेच्या राज्य पदाधिकार्‍यांचे यावेळी आभार मानन्यात आले.

Web Title: Dinesh Auti as maharashtra sahitya parishad Branch Head