‘ईडी’कडून कोल्हापूर जिल्ह्यात छापे

‘ईडी’कडून कोल्हापूर जिल्ह्यात छापे

कोल्हापूर - सक्तवसुली संचलनालय (ईडी)ने कोल्हापुरातील एका बड्या बांधकाम व्यावसायिकासह इचलकरंजीतील माजी नगरसेवक व एका सराफ व्यावसायिकावर छापा टाकला आहे. जयसिंगपूरमधील एका हॉस्पिटलवरही कारवाई केली. बेहिशेबी मालमत्ता असल्याच्या संशयावरून छापे पडल्याची चर्चा आहे. पथक अजून दोन दिवस जिल्ह्यातील काही ठिकाणी छापा टाकण्याच्या तयारीत असल्याचेही समजते.

ईडीच्या चार वेगवेगळ्या पथकांनी कोल्हापूरसह इचलकरंजी, जयसिंगपूरसह अन्य काही ठिकाणी छापे टाकल्याची प्राथमिक माहिती आहे. इचलकरंजी येथील एका माजी नगरसेवकाने गेल्या काही वर्षांत वेगवेगळ्या उद्योगांद्वारे माया जमवली आहे. मात्र, त्याचा टॅक्‍स चुकल्याचे बोलले जात आहे. याच संशयावरून ईडीने चौकशी केली. येथील एका बड्या सराफ व्यावसायिकांनी ही बेहिशेबी मालमत्ता जमवल्याचा संशय आहे. जयसिंगपूर येथील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये दोन वर्षांपासून ईडीच्या रडारवर होते. यावर मंगळवारी रात्री छापा टाकला असल्याचे बोलले जात आहे.

बहुमजली इमारतीच्या प्रकल्पांमधून नाव कमावलेला व सामाजिक कार्यात अग्रेसर असलेला कोल्हापुरातील एका बड्या बांधकाम व्यावसायिक ईडीच्या रडारवर आहे. त्याच्या घर तसेच कार्यालयावर एका पथकाने छापा टाकल्याची जोरदार चर्चा आहे. या सर्वांच्या मालमत्तांची चौकशी सुरू असून यामध्ये देश आणि मालमत्ता आढळून आल्यास प्रसंगी संबंधितांना ताब्यात घेऊन ही कारवाई होणार असल्याचे समजते. या सर्व कारवाईबाबत मात्र कमालीची गोपनीयता बाळगली जात आहे. त्यासाठी आणखी एक ते दोन दिवस हे पथक कोल्हापुरात असणार आहे. या व्यतिरिक्त अन्य काही उद्योजकांचा या यादीत समावेश आहे. ईडीचा छापा पडल्याचे समजताच अनेकांची पाचावर धारण बसली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com