वंचित 36 गावांना मिळणार आता टेंभूचे पाणी...

Disadvantaged villages of Khanapur constituency will now get water through the Tembu scheme sangli news
Disadvantaged villages of Khanapur constituency will now get water through the Tembu scheme sangli news

आटपाडी (सांगली) -  मुंबईत मुख्यमंत्री कक्षामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत टेंभू योजनेतील खानापूर विधानसभा मतदार संघातील वंचित छत्तीस गावांचा समावेश करून सहाव्या टप्प्याला मंजुरी वर शिक्कामोर्तब केला. या बैठकीला जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि आमदार अनिल बाबर उपस्थित होते.

36 गावे वगळलेले

टेंभू योजनेतून खानापूर मतदारसंघातील विसापूर आटपाडी आणि खानापूर तालुक्यातील 36 गावे वगळलेले होती. या गावांचा टेंभू योजनेत समावेश करून सहाव्या टप्प्याला मंजुरी द्यावी, अशी आमदार श्री. बाबर यांनी अनेक दिवसापासून मागणी लावून धरली होती. यासाठी आज धरणातील आरक्षित पाणीचा आढावा घेऊन मंजुरीबाबत बैठकीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.

 बैठकीत मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी जलसंपदा विभागाच्या सचिव यांच्याकडून कोयना वारणा धरणातील शिल्लक वाहून जाणारे अतिरिक्त पाणी आणि पाणी वाटपाचा आढावा घेतला. यामधून टेंभू योजनेतून वगळलेल्या गावांना पाणी देता येणे शक्य असल्याचे आमदार श्री. बाबर यांनी पटवून दिले. आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी वंचित गावांचा समावेश करून सहाव्या टप्प्याला मंजुरीची घोषणा केली.तसेच याबाबतची अधिकृत निविदा दीड महिन्यात काढण्याची घोषणा केली.                              

 अनिल भाऊ तुमची नाराजी लवकरच दूर होईल...   

या बैठकीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मागण्या मान्य करण्याची घोषणा केल्यानंतर आमदार अनिल बाबर यांना हाक मारून अनिलभाऊ तुमची येत्या सहा महिन्यात नाराज आम्ही नक्की दूर करू असे आश्वासन दिले. त्यामुळे नेमकी नाराजी मंत्रीपद की अन्य कोणती अशी, चर्चा रंगली असून आमदार श्री. बाबर यांचा मंत्रीपदाचा मार्ग मोकळा झाला अशीही, चर्चा रंगली आहे. 

या गावांना मिळणार पाणी

गुंफा, धोंडेवाडी, ऐनवाडी, जकिनवाडी, जाधववाडी,  अडसवाडी,बानुरगड,ताडाचीवाडी, विभुतवाडी, गुळेवाडी, पुजारवाडी,राजेवाडी, उंबरगाव, पिंपरी बुद्रुक, आंबेवाडी, बोंबेवाडी,किरणवाडी, नरसेवाडी, नाझरे,बलवडी,  आंबेवाडी,अजनाळे इत्यादी.                         

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com