भुजबळ-मोहिते पाटलांची बंद खोलीत दीर्घकाळ चर्चा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 डिसेंबर 2018

अकलूज : उपमुख्यमंत्रीपद भूषविलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या छगन भुजबळ आणि विजयसिंह मोहिते-पाटील या ज्येष्ठ नेत्यांनी आज येथे बंद खोलीत चर्चा केली. सध्याच्या दोलायमान राजकीय वातावरणाच्या पार्श्‍वभूमीवर या दोन नेत्यांत काय चर्चा झाली असावी याबाबत वेगवेगळे अंदाज व्यक्त केले जात आहेत. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि समता परिषदेचे प्रमुख नेते भुजबळ कार्यक्रमानिमित्त जिल्ह्यात आले आहेत. उद्या (दि. 15) सांगोल्यातील कार्यक्रमाला जाताना आज ते येथे थांबले होते. त्यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते खासदार मोहिते-पाटील यांची निवासस्थानी भेट घेतली. यावेळी खासदार मोहिते-पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. मोहिते-पाटलांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भुजबळ यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर दोघांनी काही वेळ बंद खोलीत राजकीय चर्चा झाली. भुजबळ यांच्या मुक्कामानिमित्त येथील शासकीय विश्रामगृहात दोन सूट आरक्षित करण्यात आले आहेत. मात्र, येथे मुक्कामी थांबण्यापेक्षा त्यांनी माळीनगरला पसंती दिली. 

अकलूज येथील सदिच्छा भेटीनंतर ते माळीनगरकडे रवाना झाले. माळीनगरच्या सासवड माळी शुगर फॅक्‍टरी विश्रामगृहात कारखान्याचे मनेजिंग डायरेक्‍टर राजेंद्र गोपाळराव गिरमे आणि पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. माळीनगर येथे कारखान्याचे पदाधिकारी व समाजबांधवांशी त्यांनी राजकीय व सामाजिक विषयावर विस्ताराने चर्चा केली. 

Web Title: discussion between Bhujbal And Mohite Patil