आमचं ठरलंय...ची "सीएम' भेटीने चर्चा ; आमदार गोरेंविषयी तक्रारी

आमचं ठरलंय...ची "सीएम' भेटीने चर्चा ; आमदार गोरेंविषयी तक्रारी

सातारा  : जिल्ह्यात भाजप प्रवेशाचे वारे सुरू आहे. राष्ट्रवादीतील दिग्गज नेते मंडळी मुख्यमंत्र्यांची भेट धेऊन भाजप प्रवेशाची तयारी करत आहेत. अशातच काल खटाव, माणमधील आमचं ठरलंय...मंडळींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आमदार गोरेंविषयीची नेमकी परिस्थिती त्यांच्या कानावर घातली. यामध्ये प्रभाकर देशमुख आणि प्रभाकर घार्गे यांच्या मुख्यमंत्री भेटीने उलटसुलट चर्चेला उधाण आले होते. 

गेल्या आठवडाभरापासून सातारा जिल्ह्यातून मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जाणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. यातूनही मंडळी भाजपमध्ये जाणार असाच अंदाज लावला जात आहे. राष्ट्रवादीतील तीन राजेही भाजपच्या गळाला लागले आहेत. एकाचा प्रवेश झाला, आता उर्वरित दोघांबाबत लवकरच निर्णय होणार आहे. या सर्व घडामोडीत माण तालुक्‍यातील सर्वपक्षीय आघाडीतील प्रमुख नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यामध्ये माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख, माजी आमदार प्रभाकर घार्गे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल देसाई, शिवसेनेचे नेते रणजित देशमुख यांचा समावेश होता. या भेटीची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि माण तालुक्‍यातील राष्ट्रवादीचे दोन "प्रभाकर'ही भाजपच्या वाटेवर जाणार का, या चर्चेला उधाण आले. मात्र, प्रत्यक्षात माणमधील सर्वपक्षीय आमचं ठरलंय...ग्रुपने मुख्यमंत्र्यांजवळ आमदार जयकुमार गोरेंविरोधात नेमकी परिस्थिती मांडली. त्यामुळे आमदार गोरे भाजपमध्ये जातील अथवा नाही. पण, त्यांच्याविरोधात या सर्वपक्षीय नेत्यांनी मुख्यमंत्र्यांचे कान भरले आहेत. माणमधून आमचं ठरलंय...मधील एकाच्या नावावर एकमत करण्याचा प्रयत्न सुरू असून, त्यासाठी सर्वपक्षीयांच्या प्रमुख नेत्यांना ही मंडळी भेटणार आहेत. त्यातील पहिली भेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झाली आहे. मात्र, माण, खटावमधील प्रभाकर देशमुख व प्रभाकर घार्गे यांच्या भेटीवरून उलटसुलट चर्चा सुरू झाली होती. 


सर्वपक्षीय एकजुटीने निर्णय होईल, त्याचे काम 

यासंदर्भात माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले, ""मुख्यमंत्र्यांकडे दोन ते तीन कामे होती. यातील जिल्हा बॅंकेशी संबंधित कामांसाठी आम्ही भेटलो होतो. तसेच जिहे-कठापूर योजनेचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. त्यामुळे माणमधील पाणीप्रश्‍न सुटण्याच्या मार्गावर आहे. भाजपमध्ये प्रवेश करायचा असेल तर जाहीरपणे करेन. मुळात आमच्या सर्वपक्षीय एकजुटीतून एक नाव निश्‍चित झाल्यावर आम्ही सर्वजण त्यांचे काम करणार आहोत. येथे निवडून येण्याची क्षमता लक्षात घेऊन नाव सुचविले जाणार आहे. मी स्वत: इच्छुक असलो तरी पक्षाने आणि आमच्या सर्वपक्षीय एकजुटीने निर्णय घेतला तर निवडणूक लढेन. अन्यथा जो उमेदवार दिला जाईल, त्याचे काम आम्ही करू.'' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com