शिक्षकांना "कार्यमुक्ती'चा आदेश 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 मे 2017

सोलापूर - राज्यात आपसी आंतरजिल्हा बदलीने एखाद्या जिल्हा परिषदेमध्ये जाणाऱ्या व येणाऱ्या प्राथमिक शिक्षकांना संबंधित जिल्हा परिषदेने गुरुवारी (ता. 18) कार्यमुक्त करावे, असा आदेश ग्रामविकास विभागाने दिला आहे. 29 सप्टेंबर 2011 च्या शासन निर्णयानुसार आपसी आंतरजिल्हा बदली शिक्षकांना 30 एप्रिलला कार्यमुक्त करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यात आता बदल केला आहे. 

राज्यात अनेक जिल्हा परिषदांमध्ये आपसी आंतरजिल्हा बदलीने येणाऱ्या शिक्षकांची संख्या मोठी आहे. मात्र, त्याबाबत प्रशासन काहीच निर्णय घेत नसल्याचे सोलापूर जिल्हा परिषदेच्या मागील काही महिन्यांपासून सुरू असलेल्या कारभारावरून दिसून येते. आंतरजिल्हा बदलीबाबत काही शिक्षक संघटनांनी उपोषणही केले होते. मात्र, त्यातूनही काहीच निष्पन्न झाले आहे. 29 सप्टेंबर 2011 च्या शासन निर्णयान्वये कार्यमुक्त होणाऱ्या व हजर होणाऱ्या शिक्षकांना संबंधित जिल्हा परिषदांनी 30 एप्रिलला कार्यमुक्त करण्याचे धोरण निश्‍चित केले होते. मात्र, आजच्या आदेशानुसार त्यामध्ये बदल करण्यात आला आहे. बदलीपात्र शिक्षकांना 18 मे पर्यंत कार्यमुक्त करण्याच्या सूचना राज्यातील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. बदलीपात्र शिक्षकांना कार्यमुक्त केल्यानंतर संबंधित शिक्षकाने त्वरित त्या जिल्हा परिषदेमध्ये जाऊन हजर व्हावे लागणार आहे. जिल्हा परिषदेत हजर झाल्यानंतर त्या शिक्षकांच्या पदस्थापनेचे आदेश स्वतंत्ररीत्या काढण्याचा आदेश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना ग्रामविकास विभागाचे कक्ष अधिकारी संजय कुडवे यांनी दिलेल्या पत्राद्वारे दिले आहेत.

Web Title: Dismissal order to teachers