सोनईत सफाईवरून वाद, कर्मचाऱ्यांचीच केली सफाई 

 Disputes over cleaning in Sonai
Disputes over cleaning in Sonai

सोनई : ग्रामपंचायतीतील महिला सफाई कामगारांमध्ये झालेल्या वादानंतर संबंधितांनी समझोता घडवून न आणता सर्व महिलांना काम बंद करण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे आठ दिवसांपासून गावकुस व रस्त्यांवर अस्वच्छता आहे. 

गावातील सर्व रस्त्यांबरोबरच दशक्रिया विधी ओटा, बाजारतळ, मंदिर परिसर, कौतुकी नदीपात्र भागात दिवसातून दोन वेळा झाडलोट होत होती. आठ दिवसांपूर्वी महिला सफाई कामगारांत हद्दीतील सफाईवरून वाद झाला होता. तो सोशल मीडियावरही झळकला.

हा प्रकार समजल्यानंतर ग्रामपंचायतीने संबंधितांना शिक्षा म्हणून सर्व पंधरा महिलांना कामावर न येण्याचा आदेश केला. 

अतिशय तुटपुंजा पगार असतानाही या महिला रोज पहाटे गावाची स्वच्छता करतात. सध्या ती बंद झाल्याने अनेक भागांत कचरा साचला आहे.

रविवारी (ता. 23) ग्रामपंचायतीच्या आजी-माजी सदस्यांनी संत गाडगेबाबा जयंती साजरी केली. या दिवशी तरी सफाई कामगारांना कामावर घेणे गरजेचे होते, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. 

ग्रामपंचायत कार्यालयासमोर या महिलांमध्ये वाद झाला. विनाकारण केलेल्या या प्रकारानंतर पदाधिकाऱ्यांनी, पुन्हा असे होऊ नये म्हणून तात्पुरते काम बंद केले. पर्यायी व्यवस्था केली. एक मार्चपासून त्यांचे काम पूर्ववत होईल. 
- आर. पी. बटोळे, ग्रामविकास अधिकारी  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com