अनाधिकृत बांधकामाबद्दल कऱ्हाडच्या नगराध्यक्षांना अपात्र ठरवा 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 मे 2019

कऱ्हाड येथे पदाचा गैरवापर करत व पालिकेवर दबाव आणून बांधकाम केल्या प्रकरणी नगराध्यक्षा सौ. शिंदे यांना अपात्र ठरवण्याची मागणीही तक्रारीद्वारे सामाजिक कार्यकर्ते इमतियाज बागवान यांनी केली आहे.

कऱ्हाड - येथील नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर करत विनापरवाना आणि अनाधिकृत बांधकाम केल्याची तक्रार मुख्याधिकारी यशवंत डांगे यांच्याकडे दाखल झाली आहे. पदाचा गैरवापर करत व पालिकेवर दबाव आणून बांधकाम केल्या प्रकरणी नगराध्यक्षा सौ. शिंदे यांना अपात्र ठरवण्याची मागणीही तक्रारीद्वारे सामाजिक कार्यकर्ते इमतियाज बागवान यांनी केली आहे. नगराध्यक्षा सौ. शिंदे यांनी त्यांच्या राहत्या घराजवळ केलेल्या बांधकामाची पहाणी करून त्याची परवानगी आहे की, नाही याचा अहवाल जिल्हाधिकारी यांना देण्याची मागणीही श्री. बागवान यांनी केली आहे. त्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. 

पालिकेत दाखल जालेल्या तक्रारीत म्हटले आह की, येथील पालिकेच्या नगराध्यक्षा सौ. शिंदे शनिवार पेठेत राहतात. त्यांच्या राहत्या घराजवळील साईड मार्जीन सोडलेल्या जागेत त्यांनी नविन बांधकाम केले आहे. त्याची छायाचित्रेही काढली आहेत. नगराध्यक्षांनी ते बाधकाम करण्यासाठी पूर्व परवानगी घेण्याची गरज होती. परंतू त्यांनी तशी कोणतीही परवानगी घेतलेली नाही. त्यामुळे परवानगी न घेताच बांधकाम केले आहे. त्याशिवाय बांधकाम पूर्णत्वाचाही दाखला त्यांच्याकडे नाही. वास्तविक बांधकाम पूर्णत्वाचा दाखला असल्याशिवाय तेथे राहण्याचे किंवा त्याचा भोगवाट करण्याचे अधिकार असतात. 

बांधकाम परवानगी पासून त्यांच्या बांधकाम पूर्णत्वाबाबतच्या कोणत्याच नियमाचे पालन नगराध्यक्षा सौ. शिंदे यांनी केलेले नाही. त्याबाबतही त्यांनी कोणतीही काळजी घेतलेली नाही. त्यामुळे त्यांना पदाचा गैरवापर करत पालिकेची परवानगी न घेता बांधकाम केले आहे. नगराध्यक्षा सौ. शिंदे यांच्या घराच्या साईड मार्जीन मध्ये झालेले बांधाकम पालिकेने तपासावे, अशीही मागणी तक्रारीत केली आहे, त्यानुसार पालिकेने त्यांचे बांधकाम तपासून यावे. त्यानुसार मुख्याधिकारी डांगे यांनी यांनी त्या बांधकामाची पहाणीकरून ते त्वरीत काढून टाकावे, पदाचा गैरवापर केल्याबद्दल नगराध्यक्षा सौ. शिंदे यांना अपात्र ठरविण्याचा अहवाल मुख्याधिकाऱ्यांनी दाखल करावा. महिन्याच्या आत त्यांना अपात्र करण्याचा अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करावा, तसे न झाल्यास नगराध्यक्षांविरोधात अपात्र करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे करावी, लागेल, असेही तक्रारीत म्हटले आहे.

Web Title: Disqualify the municipal head of Karhad for unauthorized construction

टॅग्स